India’s First Red Striped Road: देशात प्रथमच ! महामार्गावर लाल रंगाचे पट्टे; NHAI ने का बनवला असा रस्ता? वाचा

जबलपूर-भोपाळ महामार्गावर (NH-45) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) केलेला हा प्रयोग सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

India’s First Red Striped Road: देशात प्रथमच ! महामार्गावर लाल रंगाचे पट्टे; NHAI ने का बनवला असा रस्ता? वाचा

India's First Red Striped Road:  भारतीय रस्त्यांवर आपण नेहमी पांढरे किंवा पिवळे पट्टे पाहतो, पण आता मध्य प्रदेशातील एका महामार्गावर चक्क चमकदार लाल पट्टे दिसून येत आहेत. जबलपूर-भोपाळ महामार्गावर (NH-45) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) केलेला हा प्रयोग सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा रस्ता केवळ दिसायला वेगळा नाही, तर त्यामागे एक अत्यंत महत्त्वाचा वैज्ञानिक आणि सुरक्षेचा हेतू दडलेला आहे.

वन्यजीवांच्या संरक्षणासाठी 'रेड कार्पेट'
जबलपूर-भोपाळ महामार्गाचा एक मोठा भाग 'वीरांगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्पाच्या' घनदाट जंगलातून जातो. या भागात रस्ता ओलांडताना अनेकदा वेगाने येणाऱ्या वाहनांच्या धडकेत वन्यजीवांचा मृत्यू होतो. ही गंभीर समस्या रोखण्यासाठी NHAI ने देशात पहिल्यांदाच 'चमकदार लाल टेबल-टॉप मार्किंग' तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. या प्रकल्पांतर्गत रस्त्याच्या पृष्ठभागावर विशिष्ट प्रकारचे उंचावलेले लाल पट्टे तयार करण्यात आले आहेत.

कसे कार्य करते हे तंत्रज्ञान?
हे केवळ रंगांचे पट्टे नसून चालकांना सावध करण्याचे एक प्रभावी मानसशास्त्रीय साधन आहे. जेव्हा वाहन या लाल पट्ट्यांवरून जाते, तेव्हा टायर आणि रस्त्याच्या घर्षणामुळे एक विशिष्ट प्रकारचे कंपन (Vibration) आणि आवाज निर्माण होतो. हा आवाज आणि कंपन जाणवताच चालक आपोआप सावध होतो आणि वाहनाचा वेग कमी करण्यासाठी ब्रेक लावतो. लाल रंग हा जगभरात धोक्याचा किंवा सतर्कतेचा संकेत मानला जातो, ज्यामुळे चालकाला संवेदनशील क्षेत्रात प्रवेश करत असल्याची पूर्वसूचना मिळते.

रात्रीच्या अंधारात 'सुरक्षा कवच'
महामार्गावरील बहुतेक अपघात रात्रीच्या वेळी, कमी दृश्यमानतेमुळे होतात. जंगलाच्या भागात प्राणी अचानक रस्त्यावर आल्यास अपघात होण्याची शक्यता जास्त असते. हे लाल टेबल-टॉप मार्किंग रात्रीच्या वेळी वाहनांच्या हेडलाईटच्या प्रकाशात चमकतात. यामुळे लांबूनच चालकाला 'ॲनिमल क्रॉसिंग झोन'ची कल्पना येते, परिणामी वाहनाचा वेग मर्यादित राहतो आणि प्राण्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यास वेळ मिळतो.

हेही वाचा – Driving Licence Rules: ड्रायव्हिंग लायसन्स विसरा! वारंवार नियम मोडणाऱ्यांचे परवाने होणार कायमचे रद्द; केंद्राच्या नवीन नियमांनी बसणार चाप

पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांचे पाऊल
NHAI चा हा उपक्रम पर्यावरण आणि विकास यांच्यातील संतुलनाचे उत्तम उदाहरण आहे. यामुळे वाघ, बिबट्या आणि हरणांसारख्या दुर्मिळ वन्यजीवांचे प्राण वाचण्यास मदत होईलच, शिवाय प्राण्यांशी होणाऱ्या टकरीमुळे होणारे मानवी अपघातही टळणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास देशातील इतर जंगलातून जाणाऱ्या महामार्गांवरही असे लाल पट्टे पाहायला मिळू शकतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number