Sunday, February 08, 2026 05:27:38 PM

Digital Arrest : ईडी-सीबीआय अधिकारी असल्याचं भासवत बँकरला लुबाडल; तब्बल २३ कोटींची केली लूट

या फसवणुकीनंतरही मल्होत्रा यांची तक्रार करण्याची हिंमत होत नव्हती. अखेर, त्यांनी 19 सप्टेंबरला पोलिसांत तक्रार दिली. पण लगेच तक्रार दाखल न झाल्याने गुन्हेगारांना पकडण्याचा महत्त्वाचा वेळ निघून गेलाय.

digital arrest  ईडी-सीबीआय अधिकारी असल्याचं भासवत बँकरला लुबाडल तब्बल २३ कोटींची केली लूट

नवी दिल्ली : सध्याच्या काळात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता दिल्लीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यात एका निवृत्त बँक अधिकाऱ्याची तब्बल 22.92 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारांनी या माजी अधिकाऱ्याला 'डिजिटल अरेस्ट' करून ही फसवणूक केली आहे, ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नेमका प्रकार काय?
दक्षिण दिल्लीतील गुलमोहर पार्क येथे राहणाऱ्या 78 वर्षीय निवृत्त बँक अधिकारी नरेश मल्होत्रा यांना सायबर गुन्हेगारांनी एक महिनाभर 'डिजिटल अरेस्ट' करून ठेवले. आरोपींनी स्वतःला कधी ईडी, कधी सीबीआय तर कधी मुंबई पोलीस अधिकारी असल्याचे भासवले. यामुळे मल्होत्रा इतके घाबरले होते की, त्यांनी कोणालाही याबद्दल काही सांगितले नाही.

या काळात त्यांनी बँकेच्या अनेक शाखांना भेटी दिल्या आणि एकूण 21 व्यवहारांमध्ये 22.92 कोटी रुपये 16 वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केले. विशेष म्हणजे, ज्या बँक शाखांमधून हे व्यवहार झाले, तेथील व्यवस्थापकांनाही कोणताही संशय आला नाही. मल्होत्रा यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "मला असं वाटतं की मी वेडा झालो होतो आणि माझी विचार करण्याची क्षमता पूर्णपणे घोटाळेबाजांनी ताब्यात घेतली होती."

हेही वाचा - Sudha Murthy Threatened: दूरसंचार अधिकारी असल्याचे भासवून स्कॅमरकडून सुधा मूर्तींना धमकी; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

तक्रार आणि पुढील तपास
या फसवणुकीनंतरही मल्होत्रा यांची तक्रार करण्याची हिंमत होत नव्हती. अखेर, त्यांनी 19 सप्टेंबर रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. दिल्ली पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स शाखेचे आयुक्त रजनीश गुप्ता म्हणाले की, अशा डिजिटल अटक प्रकरणात चोरीच्या पैशांच्या घटना धक्कादायक आहेत. या प्रकरणातील पैसे 20 वेगवेगळ्या ठिकाणांवरून काढण्यात आले आहेत. तक्रार उशिरा दाखल झाल्यामुळे आरोपींना पकडणे अधिक आव्हानात्मक बनले आहे.

मल्होत्रा यांनी 4 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या काळात तीन वेगवेगळ्या बँक शाखांमध्ये जाऊन 21 वेळा आरटीजीएस ट्रान्सफर केले. हे सर्व व्यवहार उत्तराखंड, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू यांसारख्या वेगवेगळ्या राज्यांतील बँक शाखांमध्ये झाले आहेत. यातील एकही व्यवहार नवी दिल्लीतील बँकेत झालेला नाही.

मल्होत्रा यांनी 4 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत त्यांच्या खात्यांमधील तीन बँक शाखांना एकूण 21 भेटी दिल्या, तसेच 16 बँक खात्यांमध्ये 21 आरटीजीएस ट्रान्सफर केले. यामध्ये तब्बल 22.92 कोटी रुपयांचे व्यवहार झाले. हे व्यवहार वेगवेगळ्या बँकांमध्ये केले गेले आहेत. सर्वात विशेष म्हणजे हे पैसे उत्तराखंड, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यातील वेगवेगळ्या बँकांच्या शाखेत वळवण्यात आले. यातील 4,236 व्यवहारांपैकी एकही व्यवहार नवी दिल्लीतील एकाही बँकेत झालेला नाही.

हेही वाचा - Latur Crime: लातूर शहरात चोरीच्या घटनांमुळे दहशत, चोरट्यांच्या टोळीचे पोलिसांना आव्हान


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या