चार राज्यांतील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर; भाजपकडून काँग्रेसचा दारूण पराभव, पहा संपूर्ण निकाल

विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीला आणि विशेषतः काँग्रेस पक्षाला या पोटनिवडणुकीत मोठा धक्का बसला आहे.
चार राज्यांतील पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर; भाजपकडून काँग्रेसचा दारूण पराभव, पहा संपूर्ण निकाल
Four State Bypoll Results

Four State Bypoll Results: देशातील चार महत्त्वाच्या राज्यांत पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल हाती आले असून, भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली आहे. विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला आणि विशेषतः काँग्रेस पक्षाला या पोटनिवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. आसाममधील नागाव मतदारसंघात भाजपचे देवाशिष शर्मा यांनी 1,81,017 मते मिळवत AIUDF चे अध्यक्ष बदरुद्दीन अजमल यांच्यावर तब्बल 75,000 पेक्षा जास्त मतांची दणदणीत आघाडी घेतली. अजमल यांना 1,05,769 मते मिळाली, तर काँग्रेसचे उमेदवार शिबामणी बोरा अवघ्या 29,826 मतांसह तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. तसेच पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेजीनगर या दोन्ही जागांवर भाजप उमेदवारांनी अनुक्रमे हसीरानी रथ आणि सखरव सरकार यांनी आघाडी मजबूत करत काँग्रेसला मागे टाकले आहे.

पुदुच्चेरीत सत्ताधारी AINRC चा विजय; काँग्रेस उमेदवाराचा पराभव

केंद्रशासित प्रदेश पुदुच्चेरीमधील थट्टांचावडी विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी ऑल इंडिया एन. आर. काँग्रेस (AINRC) पक्षाने विजय मिळवला आहे. AINRC चे अधिकृत उमेदवार अशोक आनंद यांनी काँग्रेसच्या ई. विनायगम यांचा 8,400 हून अधिक मतांच्या फरकाने दणदणीत पराभव केला. या पराभवामुळे पुदुच्चेरीत आपली सत्ता आणि राजकीय जनाधार परत मिळवण्याच्या काँग्रेसच्या आशांना मोठा सुरुंग लागला असून, सत्ताधारी पक्षाने आपले वर्चस्व कायम राखले आहे.

हेही वाचा – मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ‘इंडिया’ आघाडी आक्रमक; 10 नेत्यांचं शिष्टमंडळ घेणार राष्ट्रपतींची भेट

तमिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाची धक्कादायक आघाडी

तमिळनाडूच्या राजकारणात मात्र एका नव्या राजकीय समीकरणाची नांदी पाहायला मिळत आहे. धारापुरम विधानसभा मतदारसंघात प्रसिद्ध अभिनेता विजय यांच्या ‘तमिळगा व्हेट्री कळगम’ (TVK) या नव्याने स्थापन झालेल्या पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. मतमोजणीच्या 10 व्या फेरीअखेर TVK उमेदवाराने 27,649 मते मिळवून आपल्या प्रतिस्पर्ध्यावर 4,128 मतांची आघाडी घेतली आहे. द्रमुक (DMK) आणि अण्णाद्रमुक (AIADMK) या पारंपरिक प्रादेशिक पक्षांना मागे टाकत TVK ने घेतलेल्या या आघाडीमुळे दाक्षिणात्य राजकारणात सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version