Fuel Leak in Indigo Flight: कोलकाताहून श्रीनगरला जाणारे इंडिगोचे विमान 6E-6961 बुधवारी वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात इंधन गळती झाल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे विमान कर्मचाऱ्यांनी तातडीने निर्णय घेऊन विमान सुरक्षितपणे उतरवले. विमानात 166 प्रवासी आणि कर्मचारी होते. सर्वांना कोणतीही दुखापत न होता बाहेर काढण्यात आले. विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमान दुपारी 4:10 वाजता सुरक्षितपणे उतरवण्यात आले.
विमानाचे आपत्कालीन लँडिंग
विमानातील तांत्रिक बिघाड लक्षात येताच पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी)शी संपर्क साधून वाराणसी विमानतळावर उतरण्याची परवानगी मागितली. एटीसीने ताबडतोब परवानगी दिली आणि क्रूने विमान काळजीपूर्वक धावपट्टीवर उतरवले. विमान उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना टर्मिनलच्या आगमन हॉलमध्ये सुरक्षितपणे नेण्यात आले. तथापी, प्रवाशांनी क्रूच्या तत्पर कारवाईचे कौतुक केले. तसेट अनेकांनी सोशल मीडियावर इंडिगो कर्मचाऱ्यांच्या धाडसाचे कौतुक केले.
हेही वाचा - Gold prices : अमेरिकन शेअर बाजार ‘मोठ्या बुडबुड्या’त, सोन्याची वाढती किंमत ही ‘धोक्याची मोठी घंटा’ – Zoho चे संस्थापक श्रीधर वेम्बू यांचा गंभीर इशारा!
तांत्रिक चौकशी सुरू
वाराणसी विमानतळ प्राधिकरण आणि तांत्रिक पथके याप्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार विमानात इंधन गळती झाली होती. तथापी, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - Air India Flight Technical Snag: हवेत तांत्रिक बिघाड! एअर इंडियाचे नेवार्कला जाणारे विमान मुंबईत परतले
प्रवाशांसाठी पुढील योजना
दरम्यान, एअरलाइनने सांगितले की, सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानाने श्रीनगरला पाठवण्यात येईल. गेल्या महिन्यात लखनौहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटमध्ये देखील तांत्रिक समस्या आल्या होत्या. फ्लाइट 6ई-2111 टेकऑफपूर्वी थांबवण्यात आली होती, ज्यामध्ये 151 प्रवासी होते.