Sunday, November 16, 2025 06:44:34 PM

Garib Rath Fire : धावत्या गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग! तीन डबे जळून खाक; बचावकार्य सुरू

आग लागल्यानंतर तात्काळ ट्रेन थांबवण्यात आली. एक महिला प्रवासी जखमी झाल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

garib rath fire  धावत्या गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग तीन डबे जळून खाक बचावकार्य सुरू

अंबाला : पंजाबमधील अमृतसरहून बिहारमधील सहरसा येथे जाणाऱ्या गरीबरथ एक्सप्रेसमध्ये शनिवारी पहाटेच्या वेळी मोठी दुर्घटना घडली. पंजाबमधील सरहिंद रेल्वेस्थानकावरून सुटल्यानंतर ही एक्सप्रेस अंबाला स्थानकाच्या एक किलोमीटर मागे असताना ही घटना घडली. या दुर्घटनेत एक्सप्रेसचे तीन डबे जळून खाक झाले आहेत.

शनिवारी (18 ऑक्टोबर) सकाळी ही गाडी सरहिंद स्टेशनवरून पुढे जात असताना, ट्रेनच्या एका डब्यातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली. प्रवाशांनी त्वरित बाहेर धाव घेतल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, आग इतक्या वेगाने पसरली की त्यामुळे ट्रेनचे तीन डबे जळून खाक झाले.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत एक महिला प्रवासी जखमी झाली आहे. पहाटे अमृतसरवरून सुटलेल्या या धावत्या ट्रेनच्या एका एसी बोगीला आग लागल्यानंतर तात्काळ ट्रेन थांबवण्यात आली. प्रवाशांनी पटापट ट्रेनमधून उड्या मारल्या. जखमी महिलेला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - Avalanche Hits Badrinath: बद्रीनाथजवळ हिमस्खलन! कुबेर भंडार हिमनदीचा काही भाग कोसळला; कोणतीही जीवितहानी नाही

सरहिंद जीआरपीचे एसएचओ रतन लाल यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, ट्रेनच्या एका डब्यातून धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे दिसताच ट्रेन थांबवण्यात आली. ट्रेन थांबताच सर्व प्रवाशी घाईघाईने ट्रेनमधून उतरले, ज्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आम्ही आगीच्या कारणांचा शोध घेत आहोत आणि लवकरच यासंबंधीचे निवेदन जारी केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या घटनेची माहिती देताना रेल्वे मंत्रालयाने देखील सांगितले की, आज सकाळी 12204 अमृतसर-सहरसा गरीबरथ एक्सप्रेसच्या एका डब्याला पंजाबमधील सरहिंद स्टेशनजवळ आग लागली. आग विझवण्यात आली असून, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

हेही वाचा - Bengaluru Crime: अभियांत्रिकी महाविद्यालयातील 21 वर्षीय विद्यार्थी, मुलीला वॉशरुममध्ये घेऊन गेला अन्..., पोलीस ठाण्यात तक्रार दाखल


सम्बन्धित सामग्री