20th Installment of PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. जुलै महिना सुरू झाला असून अद्याप पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. सहसा हा हप्ता जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. अशा परिस्थितीत देशातील कोट्यवधी शेतकरी सध्या 20 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या हप्त्यात 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. प्राप्त माहितीनुसार, जुलै महिन्यात सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता जारी करू शकते.
हेही वाचा -निवडणूक आयोगाविरुद्ध महुआ मोईत्रा यांची सर्वोच्च न्यायालयात धाव; 'या' आदेशाला दिले आव्हान
'या' दिवशी जमा होणार 20 वा हप्ता-
पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जुलै रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता जारी करू शकतात. 20 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमधील मोतिहारीला भेट देणार आहेत. अशा परिस्थितीत, या काळात हप्ता जारी केला जाऊ शकतो. तथापि, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
हेही वाचा - पंतप्रधान मोदी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित
पंतप्रधान किसान निधीची स्टेटस कसे तपासावे?
यासाठी, प्रथम pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.
आता होम पेजवरील Know Your Status or Beneficiary Status वर क्लिक करा.
आता तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर एंटर करा.
Get Data वर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला स्टेटस दिसेल.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना -
शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत, सरकार देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये देते. ही रक्कम शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये दिली जाते.