Trinidad & Tobago Highest Civilian Award: त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या राष्ट्राध्यक्ष क्रिस्टीन कांगालू यांनी शुक्रवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो प्रदान केला. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले परदेशी नेते ठरले आहेत. हा पुरस्कार केवळ औपचारिकता नाही तर भारत आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो यांच्यातील खोल संबंध आणि ऐतिहासिक संबंधांची ओळख आहे.
हेही वाचा - 4.5 ट्रिलियन डॉलर्सचा 'वन बिग ब्युटीफुल बिल' काय आहे? भारतावर काय परिणाम होईल?
हा पुरस्कार स्वीकारताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी भारतातील 140 कोटी नागरिकांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारतो. हा पुरस्कार आपल्या सामायिक इतिहासाचे, संस्कृतीचे आणि खोल मैत्रीचे प्रतीक आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो हा असा देश आहे जिथे भारतीय वंशाच्या लोकांची संख्या मोठी आहे. तिथली संस्कृती, सण आणि परंपरा अजूनही भारताशी खोलवर जोडल्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीत, हा सन्मान दोन्ही देशांमधील सहकार्य, विश्वास आणि सामायिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करतो.
हेही वाचा - पंतप्रधान मोदींना घानाचा 'ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' पुरस्कार प्रदान
पंतप्रधान मोदींचा त्रिनिदाद आणि टोबॅगोचा हा पहिलाच दौरा आहे. 1999 नंतर भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा आहे. पंतप्रधान मोदी सध्या पाच देशाच्या दौऱ्यावर आहेत. सध्या त्यांचे आगमन त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात झाले. यापूर्वी मोदींनी घानाला भेट दिली होती. तसेच धानाने मोदींना 'ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' या पुरस्काराने सन्मानित केले होते.