Gurugram Crime News: गुरुग्राम हादरलं! 11वीच्या विद्यार्थ्याने वडिलांच्या परवानाधारक पिस्तूलने झाडली वर्गमित्रावर गोळी

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना पिस्तूल, दोन मॅगझिन, सुमारे 70 जिवंत काडतुसे आणि एक रिकामी गोळी मिळाली. चौकशीत हे शस्त्र आरोपी विद्यार्थ्याच्या वडिलांचे असल्याचे समोर आले.<br/>

Gurugram Crime News: गुरुग्राम हादरलं! 11वीच्या विद्यार्थ्याने वडिलांच्या परवानाधारक पिस्तूलने झाडली वर्गमित्रावर गोळी

Gurugram Crime News: हरियाणातील गुरुग्राममध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शनिवारी रात्री संपूर्ण शहर हादरले. सेक्टर 48 परिसरात 11वीच्या विद्यार्थ्याने आपल्या वडिलांच्या परवानाधारक पिस्तूलने वर्गमित्रावर गोळी झाडली. यात 17 वर्षीय विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमंक काय घडलं ?

पोलिसांच्या माहितीनुसार, रात्री उशिरा नियंत्रण कक्षाला किशोरवयीन मुलावर गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना पिस्तूल, दोन मॅगझिन, सुमारे 70 जिवंत काडतुसे आणि एक रिकामी गोळी मिळाली. चौकशीत हे शस्त्र आरोपी विद्यार्थ्याच्या वडिलांचे असल्याचे समोर आले.

हेही वाचा – भयंकर! 'आधी दारू पाजली नंतर बिडी ओढण्यास भाग पाडलं…'; काळ्या जादूच्या नावाखाली तांत्रिकाचा महिलेवर अमानुष अत्याचार 

पीडित विद्यार्थ्याच्या आईने सांगितले की, तिच्या मुलाला त्याच संध्याकाळी एका वर्गमित्राचा फोन आला. त्याने त्याला भेटीसाठी बोलावले. ते दोघे खेरकी दौला टोलवर भेटले आणि नंतर सेक्टर 48 मधील एका फ्लॅटमध्ये गेले. तिथे आरोपीचा दुसरा मित्रही होता. काही वेळ गप्पा, जेवण झाल्यानंतर आरोपीने अचानक पिस्तूल काढून गोळीबार केला.

हेही वाचा – Viral Video: "भैय्या, मत करो प्लिज… " रॅपिडो ड्रायव्हरचं महिलेसोबत लज्जास्पद कृत्य; व्हिडिओ व्हायरल

वादातून निर्माण झालं वैर

प्राथमिक तपासात समोर आलं की तिघेही एकाच शाळेत शिकतात आणि काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात वाद झाला होता. त्याच वैरातून आरोपीने आपल्या वडिलांचे पिस्तूल घेतले आणि गोळीबार केला. रात्रभर चाललेल्या तपासानंतर पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपींना अटक केली. त्यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (खुनाचा प्रयत्न) आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number