Monday, March 09, 2026 01:51:23 AM

PM Modi Plane Emergency Landing : ऐतिहासिक क्षण! टेस्टिंग नाही, थेट ट्रायल...; मोदींच्या विमानाचं हायवेवर इमर्जन्सी लॅंडिंग, व्हिडीओ एकदा पाहाच

ईशान्य भारतातील ही पहिलीच अशा प्रकारची धावपट्टी असून, भारतीय हवाई दलाच्या सहकार्याने लष्करी आणि नागरी विमानांच्या आपत्कालीन वापरासाठी ती विकसित करण्यात आली आहे.

pm modi plane emergency landing  ऐतिहासिक क्षण टेस्टिंग नाही थेट ट्रायल मोदींच्या विमानाचं हायवेवर इमर्जन्सी लॅंडिंग व्हिडीओ एकदा पाहाच

PM Modi Plane Emergency Landing : भारताच्या सामरिक इतिहासात आज एका सुवर्णक्षराची नोंद झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आसाममधील दिब्रुगड येथे भेट दिली. येथील मोरन बायपास (झाबुआ) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान चक्क एका महामार्गावर उतरवण्यात आले. ईशान्य भारतातील ही पहिलीच 'इमर्जन्सी लँडिंग फॅसिलिटी' (ELF) असून, या यशस्वी चाचणीने भारताच्या वाढत्या लष्करी ताकदीचा परिचय जगाला करून दिला आहे. या ऐतिहासिक लँडिंगनंतर पंतप्रधानांनी तेथे लढाऊ विमाने, वाहतूक विमाने आणि हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक हवाई प्रदर्शनाचा आनंद घेतला. ईशान्य भारतातील ही पहिलीच अशा प्रकारची धावपट्टी असून, भारतीय हवाई दलाच्या सहकार्याने लष्करी आणि नागरी विमानांच्या आपत्कालीन वापरासाठी ती विकसित करण्यात आली आहे. ज्या महामार्गावर एरव्ही वाहनांची वर्दळ असते, तिथे आज पंतप्रधानांच्या विमानाने लँडिंग केले. हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. हे केवळ विमानाचे लँडिंग नव्हते, तर आपत्कालीन परिस्थितीत भारतीय हवाई दल किती सज्ज आहे, याची ही मोठी प्रचिती होती.

ईशान्येतील पहिल्या 'एक्स्ट्राडोज्ड' पुलाचे उद्घाटन
पंतप्रधानांच्या या एकदिवसीय दौऱ्यात पायाभूत सुविधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. ब्रह्मपुत्रा नदीवर बांधलेल्या 'कुमार भास्कर वर्मा सेतू'चे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे 3,030 कोटी खर्चून उभारलेला हा सहा-लेनचा पूल गुवाहाटी आणि उत्तर गुवाहाटीला जोडतो. ईशान्य भारतातील हा पहिलाच 'एक्स्ट्राडोज्ड प्रीस्ट्रेस्ड काँक्रीट' (PSC) पूल असून तो स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना मानला जात आहे.

हेही वाचा - IndiGo Flight Bomb Threat: 'विमानात बॉम्ब आहे...'; इंडिगोच्या विमानाच्या शौचालयात सापडली धमकीची चिठ्ठी, प्रवाशांमध्ये घबराट

शिक्षण आणि डिजिटल क्रांतीला बळ
पंतप्रधानांनी यावेळी IIM गुवाहाटीच्या तात्पुरत्या कॅम्पसचे उद्घाटन केले, ज्यामुळे या प्रदेशातील व्यवस्थापन शिक्षणाला मोठी चालना मिळणार आहे. यासोबतच, कामरूप जिल्ह्यातील अमीनगाव येथे 'राष्ट्रीय डेटा सेंटर'चे लोकार्पण करण्यात आले. 'डिजिटल इंडिया' मोहिमेचा भाग म्हणून हे केंद्र ईशान्येतील डिजिटल पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि दुर्गम भागातील जनतेपर्यंत सरकारी सेवा जलद गतीने पोहोचवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल.

पर्यावरणपूरक प्रवासासाठी 'पीएम-ईबस' सेवा
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पंतप्रधानांनी 'पीएम-ईबस सेवा' योजनेअंतर्गत 225 इलेक्ट्रिक बसेसना हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये गुवाहाटीसाठी 100, नागपूरसाठी 50, भावनगरसाठी 50 आणि चंदीगडसाठी 25 बसेसचा समावेश आहे. या उपक्रमामुळे शहरी भागातील प्रदूषण कमी होऊन प्रवाशांना आधुनिक आणि पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.


सम्बन्धित सामग्री