Air India Plane Crash Update: एअर इंडियाच्या ड्रीमलायनर 787-8 विमानाच्या अपघाताच्या बातमीने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. अहमदाबादहून लंडनला जाणारे एआय 171 विमान उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांनी निवासी भागातील बीजे हॉस्टेलच्या छतावर कोसळले. दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त विमानात 242 लोक होते, ज्यात 2 पायलट आणि 10 क्रू मेंबर्स होते. तथापि, या अपघातात केवळ एकच प्रवासी वाचला. रमेश विश्वास कुमार असं या प्रवासाचं नाव आहे. भारतीय वंशाचा हा ब्रिटिश नागरिक 11 क्रमांकाच्या सीटवर बसला होता. विश्वास कुमार अत्यंत चमत्कारिकरित्या या अपघातातून वाचला. ही सीट विमानाच्या आपत्कालीन एक्झिटच्या अगदी शेजारी असलेल्या खिडकीच्या सीटवर होती. यानंतर अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, ड्रीमलायनर विमानात किती आपत्कालीन एक्झिट असतात. तसेच विश्वास कुमारप्रमाणे इतर काही प्रवाशांचा जीव का वाचला नाही.
ड्रीमलायनर विमानात असतात इतक्या आपत्कालीन एक्झिट -
ड्रीमलायनर विमानाच्या सीटमॅपनुसार, विमानात 300 प्रवाशांची बसण्याची क्षमता आहे. या विमानात 230 प्रवासी होते. विमानात 8 आपत्कालीन एक्झिट आहेत. बिझनेस क्लाससमोर 2 एक्झिट, इकॉनॉमी क्लासच्या अगदी समोर 2 (रमेश बसलेला डाव्या बाजूला एक), इकॉनॉमी क्लासच्या मागे 2 आणि शौचालयाजवळ 2. विश्वास कुमार यांनी सांगितल्या प्रमाणे ते विमानाच्या त्या भागात होते जो हॉस्टेलच्या मोकळ्या जागेवर पडला. अशा परिस्थितीत त्याने बाहेर पडण्याचा थोडा प्रयत्न केला आणि त्याचा जीव वाचला.
या अपघातात वाचलेल्या प्रवाशाने डीडी न्यूजशी बोलताना सांगितले की, 'माझ्या डोळ्यासमोर सर्व काही घडले. मला अजूनही विश्वास बसत नाही की मी वाचलो. काही काळ मला वाटले की मी मरणार आहे, पण जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मला कळले की मी जिवंत आहे. मग मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करण्याचा विचार केला. मी सीट बेल्ट घातला होता. मी तो हळू हळू उघडण्याचा प्रयत्न केला. एअर होस्टेस आणि इतर प्रवासी माझ्या डोळ्यासमोर मरण पावले होते.'
हेही वाचा - भरल्या ताटावर विद्यार्थ्यांना आलं मरण! मेसमधील धक्कादायक व्हिडिओ आला समोर
टेकऑफ झाल्यानंतर फक्त एक मिनिटानंतर 5-10 सेकंदांसाठी विमानात हिरवे आणि पांढरे दिवे चालू होते. मग जेव्हा विमान उतरवण्यासाठी जास्त बळ वापरले गेले तेव्हा ते वर उडण्याऐवजी खाली पडू लागले. जिथे मी पडलो होतो तिथे हॉस्टेलची जमीन होती. मला इतर लोकांबद्दल माहिती नाही, पण जिथे माझी सीट पडली तिथे थोडी जागा होती. त्यामुळे मी वाचलो, असंही विश्वास कुमार यांनी सांगितलं.
हेही वाचा - मोठी बातमी! एअर इंडियाच्या बोईंग विमानांची चौकशी होणार; अहमदाबाद विमान अपघातानंतर DGCA चा आदेश
तज्ञांच्या मते, विश्वास कुमार आपत्कालीन एक्झिटच्या अगदी जवळ बसले होते. विमान क्रॅश होताच, त्याच्या बाजूचा भाग अशा ठिकाणी पडला जिथे बरीच जागा होती. विशेष म्हणजे आपत्कालीन एक्झिट स्वतःच तुटला, ज्यामुळे रमेशला बाहेर पडण्याची संधी मिळाली. तर इतर प्रवाशांच्या बाजूला एक भिंत होती आणि विमानात ज्या प्रकारे स्फोट आणि उष्णता होती, त्यामुळे कोणालाही पळून जाण्याची संधी मिळाली नाही.