Air India's Boeing Aircraft
Edited Image
Air India's Boeing Aircraft Investigation: भारताच्या इतिहासात 12 जून हा दिवस अत्यंत काळा दिवस होता. या दिवशी गुजरातमधील अहमदाबाद येथे मोठा विमान अपघात झाला. एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमान अहमदाबादच्या निवासी भागात कोसळले. या विमानात 242 प्रवासी होते. या अपघातात एक प्रवासी सोडता सर्वांचा मृत्यू झाला आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील त्याच विमानात होते. रुपाणी हे देखील या विमान अपघाताचा बळी ठरले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अपघात स्थळाची पाहणी केली. त्यांनी अपघातातून वाचलेल्या एका प्रवाशाची भेट घेतली. या अपघातानंतर एअर इंडियाच्या सर्व विमानाबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशा परिस्थितीत, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने बोईंग 787-8/9 विमानांवरील सुरक्षा तपासणी वाढवण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. 15 जून 2025 रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून हे नवीन निर्देश लागू होणार आहेत.
हेही वाचा - बोईंग ड्रीमलायनर 787 ला मोठा धक्का बसण्याची शक्यता! सरकार घालू शकते उड्डाणांवर बंदी
DGCA बोईंग 787-8/9 साठी दिले 'हे' निर्देश -
प्रत्येक विमानाच्या उड्डाणापूर्वी इंधन पॅरामीटर देखरेख आणि संबंधित प्रणाली तपासल्या जातील.
केबिन एअर कॉम्प्रेसर आणि त्याच्याशी संबंधित प्रणाली तपासल्या जातील.
इलेक्ट्रॉनिक इंजिन नियंत्रण प्रणालीची चाचणी घेतली जाईल.
इंजिन इंधन चालविणाऱ्या अॅक्च्युएटरची कार्यक्षमतेने चाचणी केली जाईल.
तसेच विमानाची तेल प्रणाली तपासली जाईल.
याशिवाय, हायड्रॉलिक सिस्टमची सेवाक्षमता तपासली जाईल.
तथापि, टेक-ऑफ पॅरामीटर्सचे पुनरावलोकन केले जाईल.
विमानांना 'फ्लाइट कंट्रोल इन्स्पेक्शन' आता ट्रान्झिट इन्स्पेक्शनमध्ये अनिवार्य असेल.
पॉवर अॅश्युरन्स चेक, पुढील दोन आठवड्यात पूर्ण केले जाईल.
हेही वाचा - अपघातग्रस्त एअर इंडिया विमानाचा DVR सापडला; अपघाताचे कारण समजण्यास होणार मदत? काय आहे या उपकरणाची खासियत?
अशा प्रकारे DGCA बोईंग 787-8/9 साठी निर्देश जारी केले आहेत. त्यामुळे आता बौईंग विमानांना वरील सर्व निर्देश पूर्ण केल्यानंतरचं उड्डाणाला परवानगी दिली जाईल. गुरुवारी एअर इंडियाचे विमान 242 प्रवाशांसह अहमदाबादहून लंडनला जात होते. हे विमान टेकऑफनंतर काही वेळातच कोसळले. या अपघातात आतापर्यंत 297 लोकांचा मृत्यू झाला आहे. विमान ज्या भागात पडले तेथील 56 लोकांचा मृत्यू झाला आहे.