DVR found in air india plane crash
Edited Image, X
Ahmedabad Plane Crash Update: अपघातग्रस्त एअर इंडियाच्या विमानाच्या ढिगाऱ्यातून डीव्हीआर सापडला आहे. यामुळे तपास यंत्रणांना विमान अपघातामागील खरे कारण शोधण्यास मदत होईल. गुरुवारी एअर इंडियाचे ड्रिमलाइनर विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातचं कोसळले. या अपघाताची चौकशी करणाऱ्या एटीएस पथकाच्या एका अधिकाऱ्याला विमानात असलेले DVR सापडले आहे. त्यामुळे आता विमान अपघाताच्या तपासाला गती मिळणार आहे. तथापि, आज अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्सही सापडला आहे. त्यामुळे आता विमान अपघाताचे कारण समोर येणार आहे.
विमान अपघातात आतापर्यंत 297 जणांचा मृत्यू -
गुजरातमधील अहमदाबाद विमान अपघातात आतापर्यंत एकूण 297 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. विमानात असलेल्या 242 जणांपैकी 241 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, निवासी भागात झालेल्या विमान अपघातात इतर 56 जणांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघाताच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय पथक स्थापन करण्यात आले आहे.
हेही वाचा - Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला; कारण जाणून घेण्याच्या प्रक्रियेला गती
DVR म्हणजे काय?
डीव्हीआरला डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर असेही म्हणतात. हे उपकरण सुरक्षेसाठी विमानात बसवले जाते. उड्डाणात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज त्यात रेकॉर्ड केले जातात. उड्डाणासाठी डिझाइन केलेले डीव्हीआर सामान्य डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डरपेक्षा अधिक मजबूत बनवले आहे, जे वाईट वातावरणातही बराच काळ रेकॉर्डिंग करण्यास सक्षम आहे.
DVR ची वैशिष्ट्ये -
डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर स्टोरेज डिव्हाइससारखे काम करते, ज्यामध्ये हार्ड ड्राइव्ह बसवलेले असते. हे हार्ड ड्राइव्ह स्थानिक स्टोरेजसाठी वापरले जाते. फ्लाइटच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज त्यात साठवले जाते. फ्लाइटच्या कॉक-पिटमध्ये प्रवाशांच्या केबिनपर्यंत, प्रवेश-निर्गमन गेट्स, आपत्कालीन गेट्समध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज त्यात साठवले जाते.
हेही वाचा - ट्रॅफिकमुळे फ्लाइट चुकली...अन् ती वाचली!! एअरपोर्टवर पोहोचायला 10 मिनिट उशीर झाल्याने वाचला भूमी चौहानचा जीव
विमान अपघातापूर्वी विमानात नेमक काय घडलं, याची माहिती आता या डिव्हाइसमुळे मिळणार आहे. विमान अपघातानंतर, डीव्हीआरमध्ये रेकॉर्ड केलेल्या फुटेजचे विश्लेषण केले जाईल. त्यामुळे अहमदाबाद विमान अपघातामागील कारण समजण्यास मोठी मदत होईल.