Friday, July 11, 2025 11:17:02 PM

ट्रॅफिकमुळे फ्लाइट चुकली...अन् ती वाचली!! एअरपोर्टवर पोहोचायला 10 मिनिट उशीर झाल्याने वाचला भूमी चौहानचा जीव

जे काही होतं ते चांगल्यासाठीचं. आता हे अगदी खरं ठरलं आहे. होय, एअरपोर्टवर पोहोचायला 10 मिनिट उशीर झाल्याने अहमदाबादमधील रहिवासी भूमी चौहानचा जीव वाचला आहे.

ट्रॅफिकमुळे फ्लाइट चुकलीअन् ती वाचली एअरपोर्टवर पोहोचायला 10 मिनिट उशीर झाल्याने वाचला भूमी चौहानचा जीव
Bhumi Chauhan
Edited Image

Ahmedabad Plane Crash Update: अनेकदा जेव्हा काही वाईट घडते तेव्हा आपण म्हणतो की, जे काही होतं ते चांगल्यासाठीचं. आता हे अगदी खरं ठरलं आहे. होय, एअरपोर्टवर पोहोचायला 10 मिनिट उशीर झाल्याने अहमदाबादमधील रहिवासी भूमी चौहानचा जीव वाचला आहे. गुरुवारी अहमदाबादमध्ये लंडनला जाणाऱ्या विमानाचा मोठा अपघात झाला. एअर इंडियाचं विमामन टेकऑफनंतर काही मिनिटांतच मेघनी नगरजवळील दाट लोकवस्तीच्या भागात कोसळले. या भीषण अपघातात 242 प्रवाशांपैकी 241 जणांचा आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला. कदातित भूमी चौहानला एअरपोर्टवर पोहोचायला उशीर झाला नसता तर आज तिच्यासोबत जे घडलं असतं त्याची कल्पना न केलेलीचं बरी. परंतु, भूमीची फ्लाईट फक्त 10 मिनिटांच्या विलंबामुळे चुकली आणि हा विलंब तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा 'वरदान' ठरला.

ट्रॅफिकमुळे फ्लाइट चुकली अन् ती वाचली - 

लंडनमध्ये राहणाऱ्या तिच्या पतीकडे जाणारी भूमी चौहान गुरुवारी सकाळी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर निघाली. परंतु अहमदाबाद शहरातील प्रचंड वाहतुकीमुळे तिला उशीर झाला. ती चेक-इन गेटवर फक्त 10 मिनिटे उशिरा पोहोचली, ज्यामुळे तिला चढण्याची परवानगी देण्यात आली नाही. भूमी म्हणाली, 'मी खूप प्रयत्न केले, पण विमानतळ कर्मचाऱ्यांनी सांगितले की उशीर झाल्यामुळे मला विमानात चढू दिले जाणार नाही. मी थोडी निराश होऊन परतले.' तथापि, काही वेळातचं भूमीला या अपघाताची बातमी समजली आणि तिला मोठा धक्का बसला. तिने सांगितले की, 'गणपती बाप्पाने तिला वाचवले.' 

हेही वाचा - Air India Emergency Landing: एअर इंडिया फ्लाइटला बॉम्बची धमकी? फुकेट-दिल्ली एअर इंडिया फ्लाइटची आपत्कालीन लँडिंग

भूमीने सांगितले की, जेव्हा मला कळले की विमान क्रॅश झाले आहे, तेव्हा मी पूर्णपणे हादरून गेले. मी माझ्या देवी मातेचे आभार मानते की मी वाचलो, पण ही घटना खूप भयानक आहे. मला वाटते की गणपती बाप्पाची कृपा होती की मी त्या विमानात नव्हते. मी देवाचे खूप खूप आभार मानते.' एअर इंडियाचे एआय-171 विमानाने दुपारी 1:38 वाजता उड्डाण केले आणि काही मिनिटांनंतर ते बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात कोसळले, जिथे 100 हून अधिक विद्यार्थी दुपारचं जेवण करत होते. 

हेही वाचा - 'विध्वंसाचे दुःखद दृश्य...'; अपघातस्थळी पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी शेअर केली भावनिक पोस्ट

दरम्यान, अपघातानंतर विमानाच्या भरलेल्या इंधन टाकीला मोठी आग लागली आणि आकाशात काळ्या धुराचे लोट पसरले. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह अनेक लोकांचा मृत्यू झाला. तथापी, 11 अ सीटवर बसलेला ब्रिटिश वंशाचा विश्वास कुमार रमेश हा एकमेव प्रवासी या अपघातातून वाचला. सध्या कुमार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 


सम्बन्धित सामग्री