Weather Update Rainfall Alert : भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील सात दिवसांसाठी अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत नैऋत्य मान्सूनच्या (Southwest Monsoon) परतीसाठी परिस्थिती अनुकूल बनत आहे, त्यामुळे दक्षिण भारतातील (South India) काही राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मान्सूनची परतीची अनुकूल स्थिती
पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांसह संपूर्ण झारखंड राज्यात, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, तेलंगणा आणि ईशान्य भारतात नैऋत्य मान्सून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. हवामान खात्याने यादरम्यान नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा - Cyclothon In Mumbai : NSG तर्फे मुंबईत सायक्लोथॉनचे आयोजन; 26/11 च्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानाला आदरांजली
दक्षिण भारतात जोरदार पावसाचा अंदाज
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील सात दिवसांमध्ये केरळ आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. या दोन्ही राज्यांमधील नागरिकांना हवामान विभागाने सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. देशातील काही राज्यांमध्ये मध्यम स्वरुपात पाऊस पडेल असाही अंदाज आहे.
केरळ आणि तामिळनाडू: 12 ते 18 ऑक्टोबर दरम्यान केरळ आणि तामिळनाडूमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, 12 ते 16 ऑक्टोबर दरम्यान केरळ, माहे, तामिळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारा, यानम, रायलसीमा आणि तेलंगणा येथे विजांसह वादळे आणि जोरदार वारे वाहतील. 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी लक्षद्वीपमध्येही हाच अंदाज आहे.
दक्षिण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश: 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेशातील किनारपट्टीचा भाग आणि यानम येथे जोरदार पाऊस पडेल.
मध्य आणि ईशान्य भारतातही पावसाची शक्यता
ओडिशा : 12 ऑक्टोबर रोजी ओडिशात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. 12 ते 14 ऑक्टोबर दरम्यान ओडिशात पावसाची शक्यता आहे.
विदर्भ आणि छत्तीसगड : 14 ते 16 ऑक्टोबर दरम्यान विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये पावसाची शक्यता आहे.
ईशान्य भारत : याव्यतिरिक्त, 12 आणि 13 ऑक्टोबर रोजी आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा येथे वादळाचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा - Agriculture Scheme 2025: शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय; ‘पीएम धन-धान्य कृषी योजना’ आणि ‘दलहन आत्मनिर्भरता मिशन’चा शुभारंभ