Pahalgam Terrorist Attack
Edited Image
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. आता या हल्ल्याचा तपास अतिशय वेगाने सुरू असून सुरुवातीच्या तपासात अनेक गोष्टी समोर येत आहेत. मृतांचे कपडे पाहिल्यानंतर लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिस आणि प्रशासनाच्या संयुक्त तपास पथकाने धक्कादायक विधान केले आहे. तपासकर्त्यांना असे आढळून आले की, मृतांपैकी 20 जणांचे पँट खाली ओढलेले होते. तसेच काहींचे झिपर उघडे होते.
टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि जम्मू आणि काश्मीर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने केलेल्या तपासात असे आढळून आले की, 26 पीडितांपैकी 20 जणांचे कपडे जबरदस्तीने त्यांच्या शरीराच्या खालच्या भागावरून काढून टाकण्यात आले, त्यांच्या पँटची झिप उघडण्यात आली. त्यांच्या पँट खाली खेचण्यात आल्या, ज्यामुळे त्यांचे अंतर्वस्त्रे किंवा गुप्तांग उघडे पडले.
हेही वाचा - सुरत आणि अहमदाबादमध्ये घुसखोरांवर कारवाई; दोन्ही शहरांमध्ये 500 बांगलादेशी घुसखोरांना घेतलं ताब्यात
दरम्यान, मृतदेहांची सखोल तपासणी करण्याचे काम सोपवण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकाने ही बाब उघडकीस आणली आहे. दहशतवाद्यांनी आधी लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारणा केली आणि त्यानंतर तपासणी करून त्यांना गोळ्या घालल्या. तथापि, प्रत्यक्षदर्शींच्या जबाबातून असे दिसून आले की, दहशतवाद्यांनी प्रत्येक पीडित व्यक्तीचा धर्म तपासला, त्यांच्याकडून आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी ओळखपत्रे मागितली. त्यांना कल्मा (मुस्लिम प्रार्थना श्लोक) वाचण्यास सांगितले आणि खतना झाली आहे की, नाही याची तपासणी करण्यासाठी त्यांचे खालचे कपडे काढण्यास सांगितले. या 3 'चाचण्यां'द्वारे त्यांची हिंदू ओळख प्रस्थापित झाल्यानंतर, दहशतवाद्यांनी पीडितांवर जवळून गोळ्या झाडल्या.
हेही वाचा - 'दहशतवाद सहन केला जाणार नाही, पाकिस्तानशी सर्व संबंध तोडून टाका'; सौरव गांगुली यांची मागणी
ठार झालेल्या 26 पैकी 25 पुरुष हिंदू -
मंगळवारी झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 26 जणांपैकी 25 जण हिंदू होते. दरम्यान, त्राल, पुलवामा, अनंतनाग आणि कुलगाम सारख्या विविध ठिकाणांहून सुमारे 70 ओव्हरग्राउंड वर्कर्स (OGW) आणि ज्ञात दहशतवादी समर्थकांची जम्मू-काश्मीर पोलिस, इंटेलिजेंस ब्युरो आणि RAW अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाकडून चौकशी केली जात आहे.