Sunday, November 16, 2025 05:57:48 PM

India Car Exports : या आर्थिक वर्षात भारताची कार निर्यातीत झेप; मारुती सुजूकी सगळ्यात अव्वल स्थानावर

भारताच्या वाहन निर्यातीने एप्रिल–सप्टेंबरमध्ये 18% वाढ साधली. मारुती सुजुकी सर्वाधिक 40% वाढीसह अव्वल, SUV आणि कार निर्यातीला मोठी गती मिळत आहे.

india car exports  या आर्थिक वर्षात भारताची कार निर्यातीत झेप मारुती सुजूकी सगळ्यात अव्वल स्थानावर

एप्रिल ते सप्टेंबर या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारतातील प्रवासी वाहनांच्या (Passenger Vehicles) निर्यातीमध्ये लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (Society of Indian Automobile Manufactureres) यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या कालावधीत एकूण निर्यात 18.4 टक्क्यांनी वाढून 4,45,884 युनिट्सवर पोहोचली आहे. मागील वर्षी याच कालावधीत हा आकडा 3,76,679 युनिट्स इतका होता.

प्रवासी कार निर्यातीमध्येही वाढ झाली असून, ती 12 टक्क्यांनी वाढून 2,29,281 युनिट्स झाली आहे. त्याचप्रमाणे युटिलिटी व्हेईकल्स (SUVs, MPVs) च्या निर्यातीमध्ये 26 टक्क्यांची वाढ होऊन 2,11,373 युनिट्सपर्यंत विक्रम झाला आहे. वॅनच्या निर्यातीमध्येही सर्वाधिक 36.5 टक्के वाढ नोंदवण्यात आली असून, एकूण 5,230 युनिट्स परदेशात पाठवण्यात आल्या.

या क्षेत्रात मारुती सुजुकी अग्रस्थानी राहिली आहे. एप्रिल-सप्टेंबरमध्ये कंपनीची निर्यात 40 टक्के वाढून 2,05,763 युनिट्स झाली. मागील वर्षी हेच प्रमाण 1,47,063 युनिट्स होते.

हुंडई मोटर इंडियानेही स्थिर वाढ नोंदवत 99,540 युनिट्स निर्यात केली असून, यात 17 टक्के वाढ झाली आहे.
निसानने 37,605 युनिट्स, वोक्सवॅगनने 28,011 युनिट्स, टोयोटा किर्लोस्करने 18,880 युनिट्स, किआ इंडियाने 13,666 युनिट्स आणि होंडाने 13,243 युनिट्स निर्यात केल्या असल्याचे अहवालात नमूद आहे.

हेही वाचा: 1st November New Rules : 1 नोव्हेंबरपासून होणार 'हे' मोठे बदल ; गृहिणींची चिंता वाढणार की क्रेडिट कार्डचे शुल्क ? जाणून घ्या

SIAM च्या विश्लेषणानुसार, पश्चिम आशिया (West Asia) आणि लॅटिन अमेरिकेमध्ये (Latin America) भारतीय वाहनांची मागणी मजबूत राहत असल्याने निर्यात वाढीस मोठा आधार मिळाला. बाजार विस्तार धोरणाचा फायदा होत असून, 24 देशांमध्ये भारतीय वाहन निर्यातीने सकारात्मक कामगिरी दर्शवली आहे. यात दक्षिण कोरिया, यूएई, जर्मनी, टोगो, इजिप्त, व्हिएतनाम, इराक, मेक्सिको, रशिया, केन्या, नायजेरिया, कॅनडा, पोलंड, श्रीलंका, ओमान, थायलंड, बांग्लादेश, ब्राझील, बेल्जियम, इटली आणि टांझानिया यांचा समावेश आहे.

मात्र, अमेरिकेकडे होणाऱ्या निर्यातीवर सप्टेंबर महिन्यात वाढीव शुल्कांमुळे काही प्रमाणात नकारात्मक परिणाम झाल्याचेही SIAMने नमूद केले. एकंदरीत, भारतीय ऑटोमोबाईल उद्योग जागतिक बाजारपेठेत आपले स्थान अधिक बळकट करत असल्याचा हा सकारात्मक संकेत आहे.

हेही वाचा:Jayant Naralikar : 'महाविस्फोट सिद्धांता'ला आव्हान देणाऱ्या जयंत नारळीकरांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’; केंद्र सरकारच्या राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारांची घोषणा


सम्बन्धित सामग्री