India Seizes Oil Tankers: इराणशी संबंधित तीन तेलवाहू जहाजे भारताच्या ताब्यात; देशाच्या समुद्री हद्दीमध्ये भारतीय नौदलाची मोठी कारवाई

जहाज-ते-जहाज तेल हस्तांतरणाद्वारे अवैध व्यापार रोखण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने सागरी देखरेख वाढवली आहे.

India Seizes Oil Tankers: इराणशी संबंधित तीन तेलवाहू जहाजे भारताच्या ताब्यात; देशाच्या समुद्री हद्दीमध्ये भारतीय नौदलाची मोठी कारवाई

मुंबई: भारताने फेब्रुवारी महिन्यात इराणशी संबंधित आणि अमेरिकेकडून निर्बंधित ठरवलेल्या तीन तेल टँकर जहाजांना देशाच्या समुद्री हद्दीत जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने या प्रकरणाची थेट माहिती असलेल्या सूत्राच्या हवाल्याने हा दावा केला आहे. प्रतिबंधित तेलाच्या अवैध व्यापाराला आळा घालण्यासाठी भारताने सागरी क्षेत्रातील देखरेखही मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भारताचे उद्दिष्ट स्पष्ट आहे, भारतीय समुद्री हद्दीचा वापर जहाज-ते-जहाज (Ship-to-Ship) तेल हस्तांतरणासाठी होऊ नये, ज्यामुळे तेलाचा मूळ स्रोत लपवला जातो. अशी देवाणघेवाण आंतरराष्ट्रीय निर्बंध टाळण्यासाठी वापरली जात असल्याचा संशय आहे.

जप्त करण्यात आलेल्या जहाजांची नावे स्टेलर रूबी, एस्फाल्ट स्टार आणि अल जाफझिया अशी आहेत. ही जहाजे विविध देशांच्या कायदा अंमलबजावणी संस्थांपासून बचाव करण्यासाठी ओळख वारंवार बदलत असल्याचा आरोप आहे. त्यांचे मालक परदेशात स्थित असल्याची माहितीही समोर आली आहे.

हेही वाचा: Parth Pawar : पुणे जमीन घोटाळाप्रकरण; व्यवहारादरम्यान स्वाक्षरी नसल्याने पार्थ पवार यांना मिळणार अभय? मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष

6 फेब्रुवारी रोजी भारतीय अधिकाऱ्यांनी सामाजिक माध्यमावरील पोस्टमध्ये मुंबईपासून सुमारे 100 नॉटिकल मैल पश्चिमेकडे संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर तीन जहाजांना रोखल्याचे नमूद केले होते. पुढील चौकशीसाठी ही जहाजे मुंबईत आणण्यात आली. त्यानंतर भारतीय तटरक्षक दलाने समुद्री क्षेत्रात 24 तास देखरेख ठेवण्यासाठी सुमारे 55 जहाजे आणि 10 ते 12 विमाने तैनात केल्याचे सांगितले जाते.

ही कारवाई अशा वेळी झाली आहे, जेव्हा भारत-अमेरिका संबंधांत सुधारणा झाल्याचे दिसत आहे. अलीकडेच दोन्ही देशांदरम्यान व्यापार करारावर शिक्कामोर्तब झाले असून अमेरिकेतील भारतीय वस्तूंवरील टॅरिफ 50 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी होणार आहेत. अमेरिकेने असा दावा केला आहे की भारताने रशियन तेल आयात थांबवण्यास सहमती दर्शवली आहे.

माहितीनुसार, अमेरिकेच्या ‘ऑफिस ऑफ फॉरेन ॲसेट्स कंट्रोल’ने यापूर्वी काही जहाजांवर निर्बंध लादले होते आणि जप्त केलेल्या जहाजांचे आयएमओ क्रमांक त्या यादीशी जुळत असल्याचे सांगितले जाते. जोखमीमुळे प्रतिबंधित तेल सहसा मोठ्या सवलतीत विकले जाते. मात्र, भारताने सागरी हद्दीत कायद्याची कडक अंमलबजावणी करत स्पष्ट संदेश दिला आहे. तो संदेश म्हणजे अवैध व्यापारासंदर्भात भारताकडे सहनशीलता नसेल.

हेही वाचा: Ajit Pawar Statue : अजित पवार यांना आदरांजली, बारामतीत उभारणार 10 फुट उंचीचा पुतळा; व्हिडीओ समोर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number