नवी दिल्ली: भारतीय लष्करात अधिकारी म्हणून करियर करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय लष्कराने 14 ऑक्टोबर 2025 पासून टेक्निकल एन्ट्री स्कीम (TES) 'Army 10+2 TES 55 Entry - July 2026 Batch' साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 13 नेव्हेंबर 2025 पर्यंत www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येईल. या भरतीद्वारे एकूण 90 उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
अर्ज करण्यासाठीची पात्रता खालीलप्रमाणे
अर्जदारांनी मान्यताप्राप्त मंडळातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) या विषयांसह बारावी (10+2) उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, उमेदवारांनी JEE (Main) 2025 परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे.
हेही वाचा: Restrictions For Teenage : किशोरवयीन मुलांसाठी इंस्टाग्रामचा मोठा बदल; आता दिसणार नाही 18+ कंटेंट
अर्ज करण्यासाठी आवश्यक वयोमर्यादा किती?
उमेदवारांचे वय 17.5 ते 21 वर्षांच्या दरम्यान असावे.
निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे
उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, मुलाखत आणि वैद्यकीय तपासणी यांच्या आधारे होईल. शारीरिक चाचणीत अमेदवारांना 10 मिनिटांत 2.4 किलोमीटरपर्यंत धावणे, 30 सेकंदात 40 पुश-अप्स, 6 पुल-अप्स आणि 30 सिट-अप्स पूर्ण करावे लागतील.
अर्ज प्रक्रिया
सर्वप्रथम www.joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
'Online Application' या लिंकवर क्लिक करा.
वैयक्तिक आणि शिक्षण माहिती भरा.
आवश्यक असणारी कागदपत्रे, स्वाक्षरी आणि फोटो अपलोड करा.
सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासून घ्या.