नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांच्या गोळीला बळी पडलेले भारतीय नौदलाचे 26 वर्षीय लेफ्टनंट विनय नरवाल यांना आज दिल्ली विमानतळावर श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या पत्नी हिमांशी यांनी भावनिक श्रद्धांजली वाहिली आणि म्हणाल्या की, देशाला विनयच्या बलिदानाचा अभिमान आहे. विनय आणि हिमांशी यांचे लग्न 16 एप्रिल रोजी झाले आणि ते त्यांच्या मधुचंद्रासाठी जम्मू-काश्मीरमध्ये पहलगामला गेले होते. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.
पहलगाम हल्ल्यात (Pahalgam Terrorist Attack) बळी पडलेल्या नौदल अधिकारी विनय नरवाल (Vinay Narwal) यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेताना पत्नी हिमांशीचा बांध फुटला. या दोघांचा विवाह हल्ल्याच्या केवळ 6 दिवस अगोदर 16 एप्रिलला झाला होता. लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नी हिमांशी रडत म्हणाल्या की, ‘ते कुठेही असले तरी त्यांनी आनंदी राहावे; मी नेहमीच असे काम करेन, ज्यामुळे त्यांना माझा अभिमान वाटेल, जय हिंद.’
हेही वाचा – पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला : 27 पर्यटकांचा मृत्यू, तीन दहशतवाद्यांचे स्केच प्रसिद्ध
पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेताना पत्नी हिमांशीचा बांध फुटला. यावेळी हिमांशीचे अश्रू थांबत नव्हते. विनय आणि हिमांशीचे लग्न 16 एप्रिल रोजी झाले. दोघेही त्यांचा हनिमून साजरा करण्यासाठी पहलगामला गेले होते. विनय फक्त ३ वर्षांपूर्वीच नौदलात सामील झाला होता.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, एक हृदयद्रावक फोटो व्हायरल झाला, जो पाहून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. या छायाचित्रात नौदल अधिकारी विनय नरवाल मृतावस्थेत पडलेले आणि त्यांची पत्नी हिमांशी सुन्न अवस्थेत मूकपणे त्यांच्या शेजारी बसलेली दिसत आहे.
#WATCH | Delhi | Indian Navy Lieutenant Vinay Narwal's wife bids an emotional farewell to her husband, who was killed in the Pahalgam terror attack The couple got married on April 16. pic.twitter.com/KJpLEeyxfJ — ANI (@ANI) April 23, 2025
विनयची पोस्टिंग कोची येथे होती
हिमांशी दिल्ली विद्यापीठातून पीएचडी करत आहे. त्यांचे वडील सुनील कुमार हे हरियाणा सरकारमध्ये अधिकारी आहेत. विनय, त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा, साधारण दोन- तीन वर्षांपूर्वी नौदलात सामील झाला होता आणि त्याची पोस्टिंग कोची येथे होती. लग्नासाठी घेतलेल्या सुट्टीवर होता. विवाह समारंभ पार पडल्यानंतर विनय आणि त्यांची नवविवाहित पत्नी हिमांशी मधुचंद्रासाठी जम्मू-काश्मीरमधील मिनी स्वित्झ्रर्लंड समजल्या जाणाऱ्या पहलगाम येथे आले होते.
विनयचे कुटुंब मूळचे कर्नालमधील भुसली गावचे आहे आणि सध्या ते सेक्टर-7 मध्ये राहतात. विनयचा वाढदिवस 1 मे रोजी आहे. हिमांशीने तिच्या कुटुंबाला फोनवरून दहशतवादी हल्ल्याची माहिती दिली. हे समजल्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. त्यांचे कुटुंबीय अत्यंत दुःखात आहेत. त्यांच्या इतर नातेवाईकांनी, मित्रांनी तसंच शेजाऱ्यांनी घडलेल्या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. आज त्यांच्या पार्थिवाला नमन करताना त्यांची पत्नी हिमांशीचा कंठ दाटून आला आहे. कॅमेरात ही मन गदगदून येणारी दृश्यं कैद झाली आहेत.
22 एप्रिलला नेमकं काय घडलं?
विनय नरवाल हे त्यांची पत्नी हिमांशी यांच्यासह मधुचंद्रासाठी काश्मीरला गेले होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. हिमांशी यांनी सांगितलं की मी माझ्या पतीसह भेळ खात होते. त्यावेळी एक माणूस आला आणि त्याला विचारलं की तू मुस्लिम आहेस का? त्यावर विनय नाही म्हणाला. ज्यानंतर त्या दहशतवाद्याने विनयवर गोळ्या झाडल्या. विनय नरवाल यांनी लग्नासाठी 40 दिवसांची सुट्टी घेतली होती. 16 एप्रिलला विनय आणि हिमांशी यांचं लग्न झालं. त्यानंतर 20 एप्रिलला विमानाने हिमांशी आणि विनय काश्मीरला आले होते. 22 एप्रिल रोजी विनय नरवाल यांना दहशतवाद्यांनी ठार केलं.