Monday, March 09, 2026 02:23:27 AM

Apple Phone Update: iPhone युजर्ससाठी मोठी बातमी; iOS 26.3 अपडेट लाँच, अँड्रॉइडवरून डेटा ट्रान्सफर आता होणार सुपरफास्ट

Apple ने iOS 26.3 हे नवे अपडेट उपलब्ध केले असून Android ते iPhone डेटा ट्रान्सफर अधिक सुलभ करण्यात आले आहे.

apple phone update iphone युजर्ससाठी मोठी बातमी ios 263 अपडेट लाँच अँड्रॉइडवरून डेटा ट्रान्सफर आता होणार सुपरफास्ट

Apple Inc. ने iPhone वापरकर्त्यांसाठी iOS 26.3 हे नवे अपडेट उपलब्ध केले आहे. सप्टेंबरनंतर iOS 26 मालिकेतील हे तिसरे मोठे अपडेट मानले जात आहे. काही काळ Beta Testing केल्यानंतर हे व्हर्जन अधिकृतपणे उपलब्ध करण्यात आले आहे. या अपडेटमुळे iPhone वापराचा अनुभव अधिक जलद आणि स्मार्ट होणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

iOS 26.3 अपडेटमधील सर्वात महत्त्वाची सुविधा म्हणजे Android आणि iPhone यांच्यातील डेटा हस्तांतरण (Data Transfer) अधिक सुलभ करण्यात आले आहे. आता वापरकर्ते कोणतेही Third Party App न वापरता थेट डेटा ट्रान्सफर करू शकतात. फोटो, व्हिडिओ, कॉन्टॅक्ट्स, मेसेजेस, नोट्स, पासवर्ड्स आणि डॉक्युमेंट्स सहजपणे एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाईसवर पाठवता  येणार आहेत. मात्र, ही प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित नसून काही स्टेप्स काळजीपूर्वक पूर्ण कराव्या लागतील.

याशिवाय Apple Music अ‍ॅपमध्येही काही नवे फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत. होम पेजवरील Top Picks विभागात आवडत्या गाण्यांची प्लेलिस्ट अधिक स्पष्टपणे दिसेल. तसेच आता गाण्यांचे शब्द ऑफलाइन डाउनलोड करता येतील. त्यामुळे इंटरनेट कनेक्शन नसतानाही वापरकर्ते गाण्यांचे शब्द (Lyrics ) पाहू शकतील. यासोबतच मागील iOS 26.2 मधील काही तांत्रिक त्रुटी (Bugs) देखील दूर करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: Abhishek Sharma : पाकिस्तानला भिडण्यापूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली; आजारपणामुळे स्टार फलंदाज अभिषेक शर्माचं वजन घटलं

सध्या हे अपडेट त्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे ज्यांनी iOS 26.3 बीटा प्रोग्रामसाठी नोंदणी केली आहे. iPhone 11 आणि त्यानंतरच्या मॉडेल्समध्ये हे अपडेट इंस्टॉल करता येईल. अपडेट करण्यापूर्वी फोनमधील डेटाचा संपूर्ण बॅकअप घेणे अत्यावश्यक आहे. तसेच WiFi च्या माध्यमातून अपडेट डाउनलोड करणे अधिक सुरक्षित आणि जलद ठरते, कारण मोबाइल डेटाद्वारे अपडेट करताना अधिक वेळ लागू शकतो.

नवीन अपडेट डाउनलोड करण्यासाठी वापरकर्त्यांनी iPhone मधील Settings मध्ये जाऊन General पर्याय निवडावा. त्यानंतर Software Update वर टॅप केल्यास उपलब्ध अपडेट दिसेल आणि Download and Install पर्याय निवडून प्रक्रिया पूर्ण करता येईल. अपडेट दरम्यान डिव्हाइस काही वेळा रीस्टार्ट होऊ शकते, त्यामुळे प्रक्रिया सुरू असताना फोन बंद करू नये. एकंदरित, iOS 26.3 हे अपडेट iPhone वापरकर्त्यांसाठी अधिक सुरक्षित, जलद आणि कार्यक्षम अनुभव देणारे ठरणार आहे.

हेही वाचा: Ram Charan Baby Name: राम चरणने जपली परंपरा; मुलांची नावे वाचून तुम्हीही कौतुक कराल, नावामागचा तो खास अर्थ माहीत आहे का?


सम्बन्धित सामग्री