Sunday, March 08, 2026 01:26:45 PM

IT Sector in India Vs AI : भारतीय आयटी कंपन्यांसाठी अस्तित्वाची लढाई की परिवर्तनाची संधी? GDP आणि नोकऱ्यांवर काय होणार परिणाम?

एआयमुळे काही नवीन नोकऱ्या निर्माण होतील, परंतु त्या तुलनेत पारंपरिक नोकऱ्यांवर गदा येण्याची भीती आहे.

it sector in india vs ai  भारतीय आयटी कंपन्यांसाठी अस्तित्वाची लढाई की परिवर्तनाची संधी gdp आणि नोकऱ्यांवर काय होणार परिणाम

IT Sector in India Vs AI : भारतीय आयटी क्षेत्रासमोर सध्या आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे (AI) मोठे आव्हान उभे ठाकले आहे. गेल्या काही दशकांपासून जागतिक स्तरावर आपला दबदबा निर्माण करणाऱ्या भारतीय कंपन्यांसाठी ही केवळ तंत्रज्ञानातील क्रांती नसून अस्तित्वाची लढाई बनली आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये निफ्टी IT इंडेक्समध्ये झालेली मोठी घसरण या संकटाची तीव्रता स्पष्ट करत आहे. कोडिंग आणि प्रोजेक्ट सर्व्हिसिंगवर अवलंबून असलेल्या कंपन्यांना आता एआयच्या वाढत्या विस्तारामुळे आपल्या भविष्याची चिंता सतावत आहे.

आयटी क्षेत्रातील ऐतिहासिक घसरण; एआयचा मानवी श्रमांना तडाखा
फेब्रुवारी 2026 महिना भारतीय आयटी कंपन्यांसाठी गेल्या 23 वर्षांतील सर्वात वाईट महिना ठरला आहे. निफ्टी IT इंडेक्समध्ये या एका महिन्यात 21 टक्के घसरण झाली आहे, जी एप्रिल 2003 नंतरची सर्वात मोठी मासिक घसरण आहे. या पडझडीमुळे आयटी क्षेत्राचे मार्केट कॅप 6,40,000 कोटी रुपयांहून अधिक घटले आहे. सध्या भारतीय आयटी क्षेत्राचे मूल्य 250 अब्ज डॉलर असून त्यापैकी 120 अब्ज डॉलर केवळ कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होतात. मात्र, आता एआयमुळे कोडिंग आणि ऑटोमेशनच्या कामात मानवी हस्तक्षेप कमी होत आहे. जे काम पूर्ण करण्यासाठी मानवांना 3 ते 4 दिवस लागायचे, ते काम एआय आता केवळ 10 मिनिटांत करत आहे. एआय केवळ कनिष्ठ स्तरावरील नोकऱ्याच नाही, तर मिड आणि सीनियर लेव्हलच्या व्यवस्थापकांनाही रिप्लेस करत आहे. यामुळे वर्कफोर्सची मागणी घटण्याची शक्यता असून कंपन्यांना स्वतःला पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करावे लागणार आहे.

हेही वाचा - Gold ETF Investment : सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट; 1 एप्रिलपासून बदलणार 'हे' नियम; काय होणार परिणाम?

एंथ्रोपिकची मोठी झेप आणि भारतीय कंपन्यांसमोर आव्हान
जागतिक स्तरावर एआयचे वर्चस्व कसे वाढत आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'एंथ्रोपिक' (Anthropic) ही कंपनी आहे. एंथ्रोपिकचे मार्केट कॅप 380 अब्ज डॉलरवर पोहोचले आहे, जे सर्व भारतीय आयटी कंपन्यांच्या एकत्रित मूल्यापेक्षाही जास्त आहे. विशेष म्हणजे, या कंपनीत केवळ 2,700 कर्मचारी कार्यरत आहेत. अमेरिकेतील 4 आणि चीनमधील 1 अशा केवळ मोजक्या कंपन्या संपूर्ण जगाचे एआय नियंत्रित करत आहेत. आगामी काळात एआय डेव्हलपमेंटसाठी जगभरात 200 अब्ज डॉलरची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे.

देशाच्या GDP वर होणारा परिणाम आणि भविष्य
एआयचा वापर उत्पादकता वाढवण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्यामुळे देशाच्या GDP ला गती मिळू शकते. मात्र, हे तंत्रज्ञान आत्मसात करणे ही सध्याची गरज आहे. एआयमुळे काही नवीन नोकऱ्या निर्माण होतील, परंतु त्या तुलनेत पारंपरिक नोकऱ्यांवर गदा येण्याची भीती आहे. तज्ज्ञांच्या मते, जर आपण एआयचा नैतिक आणि योग्य वापर शिकलो, तर हे संकट संधीत बदलू शकते. मात्र, जर भारतीय कंपन्यांनी वेळेत बदल केला नाही, तर जागतिक स्पर्धेत टिकून राहणे कठीण होईल.

हेही वाचा - SIP For Gen Z: पार्टी नको, आता SIP करा; विसाव्या वर्षापासून दरमाह एक हजार गुंतवा आणि करोडपती व्हा, कसं? वाचा सविस्तर

(Disclaimer : शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री