Friday, February 13, 2026 06:55:31 PM

India Pakistan Relation: रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचे ड्रोन घिरट्या घालत होते, मग भारतीय सैन्याने असं काही केलं की...

केवळ हेरगिरी नाही, तर ड्रोनच्या माध्यमातून दहशतवाद्यांना हत्यारे पुरवण्याचा पाकिस्तानचा नापाक डाव समोर आला आहे.

india pakistan relation रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचे ड्रोन घिरट्या घालत होते मग भारतीय सैन्याने असं काही केलं की

जम्मू-काश्मीर: पाकिस्तान आपल्या कुरापतींपासून कधीच धडा घेणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर दिलं असतानाही, आता पुन्हा एकदा पाकड्यांनी जम्मू-काश्मीरच्या सीमेवर ड्रोनद्वारे काड्या करण्यास सुरुवात केली आहे. सांबा, राजौरी आणि पूंछ या तीन जिल्ह्यांत एकाच वेळी पाच संशयास्पद ड्रोन घिरट्या घालताना दिसले. मात्र, भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या या उडत्या 'कचऱ्या'वर अवघ्या काही सेकंदात गोळीबाराचा वर्षाव करत त्यांना पळता भुई थोडी केली.

रविवारी संध्याकाळी 6 वाजून 25 मिनिटांच्या सुमारास पूंछच्या मनकोट सेक्टरमध्ये पहिल्यांदा ड्रोनची ब्लिंकिंग लाईट दिसली. त्यानंतर 6 वाजून 35 मिनिटांच्या  वाजता राजौरीच्या नौशेरा सेक्टरमधील गनिया आणि कलसिया गावात दुसरे ड्रोन दिसले. या हालचाली पाहताच सतर्क असलेल्या भारतीय जवानांनी 'एलएमजी' (LMG) आणि 'एमएमजी' (MMG) मधून जोरदार गोळीबार सुरू केला. भारतीय सैन्याचा हा आक्रमक पवित्रा पाहून पाकिस्तानच्या ड्रोनने शेपूट घालत थेट पाकिस्तानात पळ काढला.

हेही वाचा: Uddhav Thackeray : "...तर फडणवीसांनी अजित पवारांची जाहीरपणे माफी मागावी" अजित पवारांवर भाजपने केलेल्या 'त्या' आरोपावरून उद्धव ठाकरे कडाडले

केवळ हेरगिरी नाही, तर ड्रोनच्या माध्यमातून दहशतवाद्यांना हत्यारे पुरवण्याचा पाकिस्तानचा नापाक डाव समोर आला आहे. सांबा जिल्ह्यातील घगवाल येथील पलौरा गावात नुकताच शस्त्रास्त्रांचा साठा सापडला असून, हा साठा पाकिस्तानी ड्रोननेच खाली टाकल्याचा संशय आहे. यामध्ये दोन  पिस्तूल, तीन मॅगझिन आणि ग्रेनेड्सचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतात अशांतता पसरवण्याचा हा प्रयत्न भारताने वेळीच ओळखून पूर्ण सीमा 'हाय अलर्ट' मोडवर ठेवली आहे.

पाकिस्तानच्या या वाढत्या कुरापतींवरून सीडीएस (CDS) अनिल चौहान यांनी दिलेला इशारा आता सत्यात उतरताना दिसतोय. मे 2025 मध्ये पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. तेव्हापासून पाकिस्तान काहीसा शांत होता, पण आता पुन्हा त्यांनी शेपूट वर केलंय. पाकिस्तानने हे लक्षात ठेवावं, भारताचं 'ऑपरेशन सिंदूर' संपलेलं नाही, तर फक्त थांबलं आहे; जर पुन्हा अशी घुसखोरी केली, तर भारतीय सेना घरात घुसून मारेल!

सध्या सांबाच्या रामगढपासून ते राजौरीच्या धरमसाल गावापर्यंत सुरक्षा यंत्रणांनी मोठी शोधमोहीम राबवली आहे. जंगलात किंवा निवासी भागात काही पेलोड (हत्यारे किंवा अंमली पदार्थ) पडले आहेत का, याचा तपास 'सर्च ऑपरेशन'द्वारे केला जात आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर कितीही शांततेचा आव आणत असला, तरी त्यांचे 'ड्रोन' राजकारण त्यांची खरी दहशतवादी वृत्ती जगासमोर पुन्हा पुन्हा उघडी पाडत आहे.

हेही वाचा: Thane Election 2026: ठाणे कोणाचं? शिंदेंच्या होम ग्राऊंडवर ठाकरे बंधूची संयुक्त सभा; एकनाथ शिंदेंची धाकधूक वाढली


सम्बन्धित सामग्री