Tuesday, November 18, 2025 09:16:25 PM

हादरवून सोडणारी घटना! रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे 5 निष्पाप मुलांना एचआयव्हीची लागण? इथं घडला धक्कादायक प्रकार

या धक्कादायक प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर उच्च न्यायालयाने स्वतःहून याची दखल घेतली आहे.

हादरवून सोडणारी घटना रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे 5 निष्पाप मुलांना एचआयव्हीची लागण इथं घडला धक्कादायक प्रकार

रांची : एका रुग्णालयातून अत्यंत धक्कादायक बाब समोर आली असून, तेथे पाच अल्पवयीन मुलांना रक्त चढवल्यानंतर त्यांना एचआयव्ही (HIV) पॉझिटिव्ह झाल्याचा संशय (5 children found hiv positive after blood transfusion) व्यक्त होत आहे, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. हा गंभीर प्रकार झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील चाईबासा येथील सदर रुग्णालयात घडला आहे. थॅलेसेमिया (Thalassemia) या आजाराने त्रस्त असलेल्या या मुलांना रक्तसंक्रमणाद्वारे (Blood Transfusion) एचआयव्हीची लागण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच राज्य आरोग्य विभागाने उच्च-स्तरीय चौकशी सुरू केली आहे.

चौकशीची प्रक्रिया आणि पीडितांची संख्या
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबर रोजी रक्त देण्यात आलेल्या एका मुलाची फॉलो-अप चाचणी 18 ऑक्टोबर रोजी करण्यात आली, तेव्हा तो एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळला. यानंतर मुलाच्या वडिलांनी रुग्णालयातील रक्तपेढीच्या टेक्निशियनविरोधात निष्काळजीपणाची तक्रार दाखल केली. माध्यमांमध्ये हे वृत्त प्रसिद्ध होताच झारखंड उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली. झारखंड राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे (JSACS) एक पथक, आरोग्य सेवा संचालक डॉ. दिनेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली, 25 ऑक्टोबर रोजी चाईबासा येथे पोहोचले. त्यांच्या भेटीदरम्यान, कथितरित्या एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेले आणखी चार मुले आढळले, ज्यामुळे एकूण पीडितांची संख्या पाच झाली आहे

हेही वाचा - Gratuity Rules: केंद्र सरकारचा मोठा निर्णय: 25 लाखांची ग्रॅच्युइटी फक्त कोणाला? नियम जाणून घ्या

संक्रमणाचे स्वरूप आणि प्रशासनाची पुढील दिशा
बाधित मुलांना गेल्या अनेक वर्षांपासून दर 15 ते 30 दिवसांनी रक्त दिले जात होते, अशी माहिती उपायुक्त चंदन कुमार यांनी दिली. काही काळापूर्वी 'किट्स' च्या माध्यमातून केलेल्या तपासणीत हे पाच पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, ज्यांची यापूर्वी कधीही तपासणी झाली नव्हती.

प्रशासन सध्या तीन आघाड्यांवर काम करत आहे
1. पुढील तपासण्यांमधून निष्कर्षांची खात्री करणे. 
2. रुग्णालयाच्या रक्तदात्यांच्या डेटाबेसचा शोध घेणे. 
3. संक्रमण एकाच रक्तदात्याकडून झाले आहे की वेगवेगळ्या स्त्रोतांकडून, याची पडताळणी करणे.

उपायुक्तांनी सांगितले की, या पाचही मुलांचे रक्तगट वेगवेगळे आहेत, ज्यामुळे संक्रमण एकाच नव्हे, तर अनेक रक्तदात्यांकडून झाले असण्याची शक्यता आहे. या पाचपैकी तीन मुले आदिवासी कुटुंबातील असून, या सर्व मुलांना सध्या वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा - Alcohol Sales Increase: सणासुदीच्या काळात अल्कोहोलची विक्री झपाट्याने वाढली! 'या' प्रीमियम ब्रँड्सना सर्वाधिक मागणी


सम्बन्धित सामग्री