नव्या सर्वेक्षणातून ॲनिमियाचा डेटा का गायब झाला? मल्लिकार्जुन खर्गेंच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री नड्डांचा आकडेवारीनिशी पलटवार

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकार महिला आणि लहान मुलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याची तोफ डागली होती. यावर आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी उत्तर दिले आहे.

नव्या सर्वेक्षणातून ॲनिमियाचा डेटा का गायब झाला? मल्लिकार्जुन खर्गेंच्या प्रश्नावर आरोग्यमंत्री नड्डांचा आकडेवारीनिशी पलटवार

JP Nadda Replies to Mallikarjun Kharge : 'सार्वजनिक आरोग्यासारख्या अत्यंत संवेदनशील विषयावर राजकीय वक्तव्ये करणे पूर्णपणे चुकीचे आहे, कारण अर्धवट ज्ञान नेहमीच घातक ठरते,' अशा तिखट शब्दांत केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर पलटवार केला आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS-6) चा महत्त्वाचा डेटा भाजप सरकार मुद्दाम लपवत असल्याचा गंभीर आरोप खर्गे यांनी केला होता. या आरोपांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी नड्डा यांनी ‘X’ (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत काँग्रेसच्या ज्ञानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आरोग्य क्षेत्रात कमालीची सुधारणा; नड्डांनी मांडली आकडेवारी
काँग्रेसच्या कार्यकाळातील 2005-06 मधील आकडेवारीशी तुलना करत जे. पी. नड्डा यांनी 2015-16 (NFHS-4), 2019-21 (NFHS-5) आणि नुकत्याच जाहीर झालेल्या सर्वेक्षणाचे दाखले दिले. देशातील आरोग्य व्यवस्था आता पूर्णपणे बदलली असल्याचा दावा करत त्यांनी खालील मुद्दे मांडले:
– गर्भावस्थेतील काळजी: गर्भवती महिलांची आरोग्य नोंदणी आधीच्या 43.9 टक्क्यांवरून लक्षणीयरीत्या वाढून आता 76.2 टक्के झाली आहे.
– दवाखान्यातील प्रसूती: रुग्णालयांमध्ये सुरक्षित प्रसूती होण्याचे प्रमाण अवघ्या 38.7 टक्क्यांवरून थेट 90.6 टक्क्यांवर पोहोचले आहे.
– कुशल आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती: तज्ज्ञ आणि कुशल डॉक्टरांच्या देखरेखीखाली प्रसूती होण्याचा दर 46.6 टक्क्यांवरून वाढून 91.3 टक्के झाला आहे.
'या केवळ कोरड्या संख्या नसून, देशातील लाखो मातांना वेळेत मिळालेले योग्य उपचार आणि सुरक्षित प्रसूतीचा हा जिवंत पुरावा आहे,' असे नड्डा यांनी आवर्जून स्पष्ट केले.

हेही वाचा – Tamil Nadu Politics: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपमध्ये भूकंप! एकामागून एक बड्या नेत्यांच्या एक्झिटने खळबळ

खर्गे यांचे मोदी सरकारवर अपयशाचे गंभीर आरोप
याउलट, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकार महिला आणि लहान मुलांच्या आरोग्याचे रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याची तोफ डागली होती. हेच मोठे अपयश जनतेपासून लपवण्यासाठी केंद्र सरकार अधिकृत डेटा दडपण्याचे काम करत असल्याचा दावा त्यांनी केला. 'भाजप सरकार ‘सबका साथ’ आणि ‘अमृत काळ’ची केवळ खोटी जाहिरातबाजी करत आहे,' अशी टीका खर्गे यांनी केली. आपल्या आरोपांच्या समर्थनार्थ त्यांनी सर्वेक्षणातील काही धक्कादायक आकडेवारी देखील सादर केली:
– देशातील दर 5 पैकी 1 मूल आज तीव्र कुपोषणाचा सामना करत आहे.
– भारतातील एकूण मुलांपैकी एक तृतीयांश मुले कमी वजनाची आहेत.
– 6 ते 23 महिन्यांच्या वयोगटातील तब्बल 84 टक्क्यांहून अधिक मुलांना शरीरासाठी आवश्यक असलेले पुरेसे पोषण मिळत नाही.
मागील (NFHS-5) सर्वेक्षणात 15 ते 49 वयोगटातील तब्बल 57 टक्के महिलांमध्ये ॲनिमिया (रक्तक्षय) आढळून आला होता.

नव्या सर्वेक्षणातून ॲनिमियाचा डेटा का हटवला?
यंदाच्या नव्या सर्वेक्षणामधून ॲनिमियाची (रक्तक्षय) आकडेवारी पूर्णपणे हटवण्यात आल्यामुळेच मुख्य वादाला तोंड फुटले आहे. मात्र, यामागचे तांत्रिक कारण स्पष्ट करताना वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले की, बोटाला सुई टोचून घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यांमुळे अनेकदा ॲनिमियाचे प्रमाण गरजेपेक्षा खूप जास्त दिसते. अत्यंत अचूक माहिती मिळवण्यासाठी शिरेतून (IV) थेट रक्त घेणे गरजेचे असते.
या त्रुटी दूर करण्यासाठी आता 'आयसीएमआर' (ICMR) च्या एका स्वतंत्र आहार सर्वेक्षणाद्वारे ही माहिती गोळा केली जात असून, ती लवकरच स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली जाईल. परंतु, या नवीन पद्धतीमुळे जुन्या आणि नव्या आकडेवारीची थेट तुलना करणे आता तज्ज्ञांसाठी कठीण होणार आहे.

हेही वाचा – Ebola Case In India: इबोलाचा भारतात शिरकाव? युगांडाहून जयपूरमध्ये आलेल्या परदेशी महिलेमध्ये लक्षणे; आरोग्य यंत्रणा हायअलर्टवर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number