Karnataka Showroom Car Accident CCTV Video: कर्नाटकच्या सागर येथील एका मारुती शोरूमबाहेर अत्यंत थरारक आणि हादरवून सोडणारी दुर्घटना घडली आहे. नुकतीच खरेदी केलेली नवी कोरी गाडी शोरूम बाहेर काढत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि काही सेकंदांत मोठा अपघात झाला. या घटनेचा सीसीटीव्ही (CCTV) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
थरारक अपघाताने उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला
शोरूममधून गाडी बाहेर काढताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. अनियंत्रित कारने थेट रस्त्याकाठचे लोखंडी बॅरिकेड्स तोडले. बॅरिकेड्स तोडून ती कार वेगाने मुख्य रस्त्यावर आली. रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीला या कारने जोरदार धडक दिली.
हेही वाचा – अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सारा अली खान हुंदके देऊन रडू लागली! व्हिडीओ तुफान व्हायरल
जखमींची स्थिती आणि लोकांची धावपळ
या भीषण दुर्घटनेत दुचाकीवरील 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. अवघ्या काही सेकंदात घडलेल्या या प्रकारामुळे घटनास्थळी एकच गदारोळ उडाला. आवाज ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना मदतीचा हात दिला आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.
A festive occasion turned into a frightening incident in Sagara town of Shivamogga district when a brand-new car crashed into a moving motorcycle moments after being driven out of a showroom during the Ayudha Puja celebrations. According to preliminary reports, the customer had taken delivery of the new vehicle after performing the traditional Ayudha Puja rituals. However, the driver reportedly lost control while attempting to drive the car out of the showroom premises. The car broke through the showroom’s safety barricades and entered the main road before colliding head-on with an oncoming motorcycle. The impact severely damaged the two-wheeler and threw both the rider and the pillion rider onto the road. Showroom staff and local residents rushed to the scene and shifted the injured individuals to a hospital in Sagara for treatment. Police from Sagara Town Police Station visited the spot, conducted an inspection, and registered a case. Preliminary reports suggest that accidental acceleration or an error while shifting gears may have contributed to the crash. Further investigation is underway to determine the exact cause of the accident. — Hate Detector 🔍 (@HateDetectors) October 20, 2026
पोलिसांचा तपास आणि पुढील कारवाई
सध्या व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सागर येथील पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. कार चालकाचे नेमके नियंत्रण कसे सुटले आणि अपघाताचे खरे कारण काय होते, याचा शोध घेतला जात आहे. अद्याप अपघातामागील नेमके तांत्रिक किंवा मानवीय कारण समोर आलेले नाही, परंतु पोलीस या दिशेने कसून चौकशी करत आहेत.
हेही वाचा – कॅनडात सेटल करण्याचे आमिष अन्… टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात गुजरातमधून आठवा आरोपी जेरबंद
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.