Lawrence Bishnoi Gang Firing: कॅनडामध्ये पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या सदस्यांनी गोळीबार घडवून आणल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची जबाबदारी फतेह पोर्तुगाल नावाच्या सदस्याने सोशल मीडियावर स्वीकारली असून, त्याच्या पोस्टनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. या पोस्टमध्ये नवी टेसी नावाच्या व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने लोकांकडून 50 लाख रुपये उकळले होते असे म्हटले आहे. म्हणून, आम्ही त्याच्या लपण्याच्या ठिकाणांवर गोळीबार केला आहे.
फतेह पोर्तुगालने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, 'सत श्री अकाल, सर्व भावांना राम राम. हे फतेह पोर्तुगाल आहे. आम्ही आता गोल्डी ढिल्लन आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीची जबाबदारी घेत आहोत. काही जण कॅनडामध्ये लॉरेन्सच्या नावाने पैसे उकळत आहेत. त्यामुळे गोळीबार करण्यात आला.' या पोस्टमध्ये नवी टेसी नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करताना फतेहने म्हटले आहे की, 'नवी टेसीने लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने लोकांकडून 50 लाख रुपये उकळले, म्हणून आम्ही त्याच्या लपण्याच्या ठिकाणांवर गोळीबार केला.' पोस्टमध्ये फतेहने गोळीबार झालेल्या ठिकाणांचे पत्ते आणि तपशीलही नमूद केले, ज्यामुळे कॅनडामधील पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.
हेही वाचा - Mumbai Crime: आधी बोट कापले, नंतर मनगट कापले... दोन अल्पवयीन मुलांसमोर आरोपींनी वडिलांना संपवलं
फतेहने पुढे आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, 'ही सर्व ठिकाणे नवी टेसी यांच्या मालकीची आहेत. आम्ही गेल्या तीन दिवसांपासून या ठिकाणी शूटिंग करत आहोत. आमचा कोणताही वैयक्तिक द्वेष नाही, पण जो लोकांना धमकावून पैसे उकळतो, त्याला आम्ही सोडणार नाही. आमची पद्धत चुकीची वाटू शकते, पण आमचे हेतू चुकीचे नाहीत.' त्याने व्यापाऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना इशारा देताना म्हटले आहे की, 'जर कोणी आमच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवल्या, तर त्यातून होणाऱ्या हानीची जबाबदारी आमची नसेल.'
हेही वाचा - Shocking Crime : डोक्यात गेला.. विषय संपला! लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराची गर्भवती प्रेयसीने केली निर्घृण हत्या
कॅनडाने अलीकडेच लॉरेन्स बिश्नोईला अधिकृतपणे दहशतवादी घोषित केले आहे, आणि आता या नव्या घटनेनंतर स्थानिक सुरक्षा यंत्रणा आणि भारतीय तपास यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. या टोळीमध्ये अंकित भादू शेरवाला, जितेंदर गोगी मान ग्रुप, कला राणा, आरजू बिश्नोई, सुभम लोणकर आणि साहिल दुहान हिसार यांसारखे गुंड सामील असल्याची माहिती समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव गेल्या काही वर्षांत अनेक आंतरराष्ट्रीय गुन्हे आणि धमक्यांशी जोडले गेले आहे. कॅनडा, भारत आणि इतर देशांमध्ये या टोळीच्या हालचालींवर आधीपासूनच स्थानिक पोलिसांचे विशेष लक्ष आहे.