सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात निदर्शने करणाऱ्या वकिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात; SCBA ची सरन्यायाधीशांकडे धाव अन्..

हे आंदोलनाचे लोण थेट सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरापर्यंत पोहोचले, जिथे वकिलांच्या एका गटाने निदर्शने करण्यास सुरुवात केली.
supreme court
supreme court

Lawyers Detained at SC: विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेतील कथित गैरकारभाराच्या विरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने (CJP) राजधानी दिल्लीत तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दिल्लीत मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय एकत्र आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 500 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले. यामध्ये सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात वकिलांचे निषेध प्रदर्शन; महिला वकिलांवर..

हे आंदोलनाचे लोण थेट सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरापर्यंत पोहोचले, जिथे वकिलांच्या एका गटाने शांततापूर्ण मार्गाने निदर्शने करण्यास सुरुवात केली. मात्र, दिल्ली पोलिसांनी या निदर्शकांवर कारवाई करत अनेक वकिलांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी अतिरेकी बळाचा वापर केला आणि महिला वकिलांशी गैरवर्तन केले, असा गंभीर आरोप सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने (SCBA) केला आहे. या अचानक झालेल्या कारवाईमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात मोठी खळबळ उडाली आणि वकिलांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा – दिल्लीत CJP चं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न; विमानं, रेल्वे, बसेस अन् रस्त्यांवरून 500 हून अधिक जण ताब्यात

सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना पत्र

या घटनेची गंभीर दखल घेत सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने (SCBA) भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना तातडीने पत्र लिहून या प्रकरणात मध्यस्थी करण्याची मागणी केली. असोसिएशनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, पोलीस कोठडीत असलेल्या प्रत्येक वकिलाचा ठावठिकाणा, त्यांची सुरक्षितता आणि त्यांना योग्य कायदेशीर मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही ठोस कायदेशीर कारणाशिवाय ज्या वकिलांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यांची तात्काळ आणि सन्मानपूर्वक सुटका करण्यात यावी, अशी विनंती असोसिएशनने पत्राद्वारे सरन्यायाधीशांकडे केली.

वृत्तानुसार सरन्यायाधीशांचे पोलिसांना निर्देश

एका कायदेशीर वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, SCBA च्या पत्राची तात्काळ दखल घेत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क साधला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारातून ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व वकिलांची विनाविलंब सुटका करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश सरन्यायाधीशांनी प्रशासनाला दिले आहेत. सरन्यायाधीशांच्या या हस्तक्षेपामुळे अटकेत असलेल्या वकिलांना मोठा दिलासा मिळाला असून, या कारवाईचे बार असोसिएशनतर्फे स्वागत करण्यात आले आहे.

हेही वाचा – ”दुपारपर्यंत वाट पाहणार अन्यथा…”; अभिजीत दिपकेंच्या आई-वडिलांनी स्पष्ट केली भूमिका

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version