Trainee IPS Officer Arrest: ‘खोलीत डांबलं, चाकूने धमकावलं अन् गळा आवळला…’; लैंगिक छळाचा आरोप असलेले IPS अधिकारी उदय कृष्ण रेड्डी पोलिसांच्या ताब्यात

गुन्हा दाखल झाल्यानंतर सुमारे 10 दिवसांपासून फरार असलेल्या रेड्डी यांचा अट्टापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने शोध घेतला.

Trainee IPS Officer Arrest: ‘खोलीत डांबलं, चाकूने धमकावलं अन् गळा आवळला…’; लैंगिक छळाचा आरोप असलेले IPS अधिकारी उदय कृष्ण रेड्डी पोलिसांच्या ताब्यात

Trainee IPS Officer Arrest:  महिला प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्याचा लैंगिक छळ करणे, तिला अश्लील संदेश पाठवणे आणि खाजगी व्हिडिओ गुपचूप रेकॉर्ड करून धमकी दिल्याचा गंभीर आरोप असलेले आरोपी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी उदय कृष्ण रेड्डी यांना अखेर हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सुमारे 10 दिवसांपासून फरार असलेल्या रेड्डी यांचा अट्टापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने शोध घेतला. मंगळवारी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून, पुढील न्यायालयीन कारवाई सुरू करण्यात आली आहे.

महिला आयपीएस अधिकाऱ्याचे गंभीर आरोप 
हे संपूर्ण प्रकरण 18 जुलै रोजी अट्टापूर पोलीस ठाण्यात एका 30 वर्षीय महिला प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याने नोंदवलेल्या तक्रारीनंतर उघडकीस आले. तक्रारीनुसार, आरोपी उदयने 23 जूनपासून तिचा सातत्याने लैंगिक छळ केला. त्याने व्हॉट्सॲपवर अश्लील संदेश पाठवणे, अपशब्द वापरणे आणि इतर सहकाऱ्यांसमोर अयोग्य टिप्पण्या करण्याचे कृत्य केले. याशिवाय 10 जुलै रोजी त्याने पुन्हा तिच्यावर हल्ला केल्याचा गंभीर आरोपही पीडितेने केला आहे.

खोलीत डांबून मारहाण, गळा आवळण्याचा प्रयत्न अन् व्हिडिओ रेकॉर्डिंग
पीडित महिला अधिकाऱ्याने तक्रारीत नमूद केले की, आरोपीने बळजबरीने तिचा मोबाईल फोन हिसकावून पासवर्ड सांगण्यास भाग पाडले. तिला स्वतःच्या खोलीत डांबून ठेवत तिचे केस ओढले, गळा आवळण्याचा प्रयत्न केला आणि चाकू दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. यासोबतच, तिचे खाजगी व्हिडिओ गुपचूप रेकॉर्ड करून ते तिच्या पतीला पाठवून ब्लॅकमेल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

भारतीय न्याय संहितेच्या अनेक गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल
या धक्कादायक तक्रारीच्या आधारे अट्टापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 74, 75, 77, 78, 79, 127(2), 115(2) आणि 351(2) अंतर्गत विविध गंभीर गुन्हे नोंदवले आहेत. तसेच, तंत्रज्ञानाचा गैरवापर केल्याप्रकरणी आयटी (IT) कायद्याच्या कलम 66E आणि 67A अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – Crime News: लग्नाला नकार दिल्याने प्रियकराचं भयंकर कृत्य; आधी प्रेयसीचा गळा दाबला, नंतर मृतदेहावर पेट्रोल ओतलं अन्…

दुसरीकडे, आरोपी उदय कृष्ण याने इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले होते. दरम्यान, 22 जुलै रोजी एका नातेवाईकाच्या घरी मद्यपान केल्यानंतर तो बेशुद्ध अवस्थेत आढळला होता, जे पोलिसांच्या मते सहानुभूती मिळवण्यासाठी केलेले कृत्य होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच आरोपीचा मोबाईल बंद झाला आणि तो गायब झाला. त्यानंतर पोलिसांनी 4 विशेष पथके तयार करून त्याला शोधून काढले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number