Vaishno Devi Mandir: वैष्णोदेवी मंदिरात व्हिडीओ बनवणे पडणार महागात; छुपा कॅमेरा वापरणाऱ्यांवर थेट…

मंदिराच्या इमारतीचे किंवा गर्भगृहाचे व्हिडीओ चित्रित करणे आता भाविकांना महागात पडू शकते.

Vaishno Devi Mandir: वैष्णोदेवी मंदिरात व्हिडीओ बनवणे पडणार महागात; छुपा कॅमेरा वापरणाऱ्यांवर थेट…

Vaishno Devi Mandir: हिंदू भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री माता वैष्णोदेवी मंदिराच्या सुरक्षेबाबत श्राइन बोर्डाने आता अत्यंत कठोर पाऊले उचलली आहेत. मंदिराच्या इमारतीचे किंवा गर्भगृहाचे व्हिडीओ चित्रित करणे आता भाविकांना महागात पडू शकते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध थेट एफआयआर (FIR) दाखल करण्याचे आणि कठोर शिक्षा देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 

छुपा कॅमेरा वापरणाऱ्यांवर पोलिसांची नजर
नुकतेच एका कंटेंट क्रिएटरने आपल्या चष्म्यात छुपा कॅमेरा लावून मंदिराच्या इमारतीचा व्हिडीओ चित्रित केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकारानंतर श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने पोलिसांच्या मदतीने त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. कटरापासून ते मुख्य मंदिरापर्यंत प्रत्येक टप्प्यावर भाविकांची कसून तपासणी केली जात आहे. जर एखादा भाविक छुपा कॅमेरा किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणासह आढळला, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

सुरक्षा आणि गोपनीयतेसाठी बंदी
वैष्णोदेवी मंदिराच्या सुरक्षेमुळे, धार्मिक प्रतिष्ठेमुळे आणि गोपनीयतेमुळे पवित्र गुहेत किंवा मंदिर परिसरात फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीवर पूर्णपणे बंदी आहे. हा नियम केवळ सर्वसामान्यांसाठीच नाही, तर व्हीआयपी (VIP) आणि व्हीव्हीआयपी (VVIP) लोकांसाठीही तितकाच लागू आहे. धार्मिक स्थळाची शांतता आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी हे निर्बंध पाळणे अनिवार्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा – Supreme Court : 'हा लोकशाहीला लागलेला अभिशाप'; घराणेशाहीवरून ताशेरे ओढत सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले फ्लॅटचे बेकायदा वाटप

महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
सोशल मीडियावर व्ह्यूज मिळवण्यासाठी चष्म्याचा छुपा कॅमेरा वापरून व्हिडीओ बनवणाऱ्या एका महिला कंटेंट क्रिएटरविरुद्ध श्राइन बोर्डाने पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे. या घटनेमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते, त्यानंतर आता कटरा ते भवनपर्यंतच्या प्रत्येक पायरीवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांनी मंदिराच्या नियमांचा आदर करावा आणि डिजिटल उपकरणांचा गैरवापर टाळावा, असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number