भरधाव बस झाडावर धडकली; बस मालकासह 6 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, 25 जण गंभीर जखमी

मनेन्द्रगडहून केलहारीच्या दिशेने 30 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी एक खाजगी प्रवासी बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडावर धडकली.
भरधाव बस झाडावर धडकली; बस मालकासह 6 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, 25 जण गंभीर जखमी
Manendragarh bus accident

छत्तीसगडमधील मनेन्द्रगड-चिरमिरी-भरतपूर जिल्ह्यात गुरुवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारा रस्ते अपघात घडला आहे. मनेन्द्रगडहून केलहारीच्या दिशेने 30 हून अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी एक खाजगी प्रवासी बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडावर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, बस मालकासह 6 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर तब्बल 25 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे.

बसचा पुढचा भाग चक्काचूर

केळहारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेमरामथानी वळणावर दुपारी 2:00 वाजेच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या या बसचे वळणावर अचानक नियंत्रण सुटले आणि ती थेट झाडावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात प्राण गमावलेल्यांमध्ये 3 पुरुष, 2 महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. सध्या पोलीस प्रशासन मृत आणि जखमी व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम करत आहे.

हेही वाचा – 8 महिन्यांच्या बाळाचा धक्कादायक शेवट! दलदलीत सापडला मृतदेह, अखेर 3 वर्षांनंतर आईपर्यंत पोहोचले पोलीस

15 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक; रुग्णालयात उपचार सुरू

अपघातातील 25 जखमींपैकी चालकासह 15 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सर्व गंभीर जखमींना तातडीने मनेन्द्रगड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे, तर उर्वरित 10 किरकोळ जखमींवर केलहारी येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. ही बस अचानक अनियंत्रित कशी झाली, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version