मोठी बातमी! ज्ञानेश कुमारांच्या अडचणी वाढणार? विरोधातील याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

दिल्ली आणि मुंबईसह आता देशभरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनाने तीव्र भूमिका घेतली आहे. अशातच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! ज्ञानेश कुमारांच्या अडचणी वाढणार? विरोधातील याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Dnyanesh Kumar

दिल्ली आणि मुंबईसह आता देशभरात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनाने तीव्र भूमिका घेतली आहे. अशातच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील सर्व याचिका एकत्रित करून त्यावर सुनावणी घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. न्यायालयाने ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील सर्व याचिका एकत्र करून यावर येत्या 27 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्व याचिका स्वीकारताना मुख्य निवडणूक आयुक्तांसह इतर दोन निवडणूक आयुक्तांनाही प्रतिवादी केले आहे. ज्ञानेश कुमार यांच्यावर निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता, मतदार याद्यांमधील त्रुटी आणि स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन प्रक्रियेवरून याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

हेही वाचा- ‘भारताच्या अंतर्गत विषयात लुडबुड सहन करणार नाही…’; दिल्लीतील आंदोलनावरील वक्तव्यावरून भारताचे संयुक्त राष्ट्रांना खडेबोल

या याचिकाकर्त्यांमध्ये विरोधी पक्षांचे प्रमुख नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, खासदार संजय राऊत, सुप्रिया सुळे, एम. ए. बेबी, डी. राजा, महुआ माझी, सौगत रॉय आणि ई. टी. मोहम्मद बशीर या 11 प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयानंतर 27 ऑक्टोबर रोजी पार पडणाऱ्या सुनावणीकडे देशाचे लक्ष लागले असून, न्यायालयात नेमके कोणते मुद्दे उपस्थित केले जातात आणि त्यावर काय भूमिका मांडली जाते, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

या सुनावणीदरम्यान न्यायालयाकडून कोणते निरीक्षण नोंदवले जाते आणि पुढे काय निर्णय घेतला जातो, यावर या प्रकरणाची पुढील दिशा अवलंबून असेल. दरम्यान, या प्रकरणातील याचिकांचे स्वरूप आणि न्यायालयाचा अंतिम निर्णय याबाबत अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच पुढील घडामोडी स्पष्ट होणार आहेत.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number