Delhi Fire: राजधानीतील डॉ. बिशंबर दास मार्गावरील ब्रह्मपुत्र अपार्टमेंटमध्ये शनिवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. हे अपार्टमेंट संसद भवनापासून फक्त 200 मीटर अंतरावर आहे. त्यात अनेक राज्यसभा खासदारांचे फ्लॅट आहेत. आग लागल्याने परिसरात घबराट पसरली.
अग्निशमन दलाला दुपारी 1:20 वाजता आगीबाबत तात्काळ फोन आला. त्यानंतर सहा अग्निशमन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. तळमजल्यावर आग लागली आणि पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर पसरली. भीषण ज्वाला आणि धुरामुळे परिसरात धुरकट वातावरण निर्माण झाले.
हेही वाचा - Garib Rath Fire : धावत्या गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग! तीन डबे जळून खाक; बचावकार्य सुरू
आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दल सतत प्रयत्न करत आहे. पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून, मदत आणि बचावकार्यात गुंतलेले आहेत. अपार्टमेंटच्या बाहेर मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते, ज्यामुळे रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली होती. सध्या कोणतीही जिवितहानी झालेली नाही. सुरक्षा दृष्टिकोनातून हा परिसर अत्यंत संवेदनशील असल्याने प्रशासनाने तातडीने आवश्यक खबरदारी घेतली आहे.
हेही वाचा - Rishi Sunak : 'संरक्षणवादी जगात भारताने दाखवली सकारात्मक दिशा'; ऋषी सुनक यांचे भारताच्या धोरणाचे कौतुक
प्रत्यक्षदर्शींनी असा दावा केला की, अपार्टमेंटमधील अग्निशामक यंत्र काम करत नव्हते. तसेच टाकी आणि पाइपलाइनमध्ये पाणी नव्हते. आग दिसल्यानंतर आम्ही अग्निशामक यंत्र तपासले, पण पाणी नव्हते. तसेच अग्निशामक यंत्र काम करत नव्हते, असे एका रहिवाशाने एनडीटीव्हीला सांगितले. तथापी, व्हिडिओमध्ये पोलीस लोकांना सुरक्षित ठिकाणी नेताना दिसत आहेत. आग नियंत्रणात आणल्यावरच परिसरातील परिस्थिती पूर्णपणे शांत होईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.