Nora Fatehi Accident : अभिनेत्री नोरा फतेहीच्या कारला मद्यधुंद ड्रायव्हरची धडक; अभिनेत्रीच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती

CT Scan नंतर डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला, मात्र तरीही तिने सनबर्न फेस्टिव्हलमध्ये परफॉर्मन्स पूर्ण केला.

Nora Fatehi Accident : अभिनेत्री नोरा फतेहीच्या कारला मद्यधुंद ड्रायव्हरची धडक; अभिनेत्रीच्या तब्येतीबाबत महत्त्वाची माहिती

मुंबई: बॉलिवूडची डान्स क्वीन नोरा फतेही हिच्या चाहत्यांसाठी एक काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली आहे. शनिवारी संध्याकाळी मुंबईच्या गजबजलेल्या अंधेरी परिसरात एका अनपेक्षित घटनेने खळबळ उडवून दिली. शिवडी येथील 'सनबर्न फेस्टिव्हल'मध्ये प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय डीजे डेव्हिड गुएटा यांच्यासोबत परफॉर्म करण्यासाठी नोरा उत्साहात निघाली होती. मात्र, दुपारी चार वाजताच्या सुमारास काळाने झडप घातली आणि तिच्या आलिशान कारचा भीषण अपघात झाला.

एका मद्यधुंद चालकाने नोराच्या कारला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचे मोठे नुकसान झाले आणि नोरा जखमी झाली.तिच्या टीमने विलंब न करता तिला जवळच्या रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी तातडीने CT Scan करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये शरीराच्या अंतर्गत रक्तस्त्राव होत असल्याचे समजले. नोराला नेमकी किती गंभीर दुखापत झाली असेल, या चिंतेने तिच्या चाहत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

हेही वाचा: Dhurandhar Worldwide Collection: 'धुरंधर' चे निर्माते झाले मालामाल! भारतात 500 तर जगभर 'इतक्या' कोटींची कमाई

डॉक्टरांच्या तपासणीनंतर काही अंशी दिलासा मिळाला असला तरी तिच्या तब्बेतीसाठी डोक्याला मार लागल्यामुळे डॉक्टरांनी तिला सक्त विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान, अंबोली पोलिसांनी त्या मद्यधुंद चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. हा केवळ अपघात होता की आणखी काही? याचा शोध घेण्यासाठी पोलीस आता परिसरातील CCTV फुटेजची कसून चौकशी करत आहेत.

सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर नोराने जे केले ते कोणाच्याही कल्पनेपलीकडचे होते. डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचे बजावले असतानाही, नोराने आपल्या वेदनांकडे दुर्लक्ष करून कामाला प्राधान्य दिले. तिने त्याच संध्याकाळी सनबर्न फेस्टिव्हलच्या मंचावर जाऊन आपला परफॉर्मन्स पूर्ण केला. तिच्या या जिद्दीने उपस्थित प्रेक्षकांना थक्क केले, मात्र तिच्या आरोग्याबाबतचा प्रश्न अजूनही कायम आहे.

नोरा फतेहीने आजवर जेसन डेरुलोसोबत "Snake" आणि "Oh Mama Tatema!" सारख्या जागतिक दर्जाच्या गाण्यांवर आपल्या नृत्याची जादू दाखवली आहे. नुकताच झालेला हा अपघात तिच्या करिअरमधील एक मोठा धक्का मानला जात आहे. ती आता पूर्णपणे सावरली आहे पण तिला पुन्हा उपचारांची गरज भासणार का?, या चिंतेत तिचे चाहते आहेत.

हेही वाचा: Gaganyaan Mission : गगनयान मोहिमेसाठी ड्रोग पॅराशूट चाचणी यशस्वी; ISRO चा महत्त्वपूर्ण टप्पा पार, पहा व्हिडिओ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number