Post Office Fast Delivery Service: पोस्ट ऑफिसच्या पार्सल सेवेसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय टपाल विभाग लवकरच नवीन जलद वितरण सेवा सुरु करणार असल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली आहे. या सेवेमुळे, पोस्ट ऑफिस आता 24 आणि 48 तासांच्या आत मेल आणि पार्सल पोहोचण्याची हमी देईल. याचा अर्थ असा की महत्त्वाचे कागदपत्रे, पार्सल किंवा व्यवसायातील शिपमेंट आता फक्त काही तासांत ग्राहकांच्या घरी पोहोचतील.
सिंधियांच्या माहितीनुसार, 24 तासांची स्पीड पोस्ट सेवा एका दिवसात तुमच्या घरी कोणतीही टपाल वस्तू पोहोचवेल, तर 48 तासांची सेवा दोन दिवसांत पार्सल वितरित करेल. यामुळे लोकांना त्यांच्या गरजेनुसार जलद किंवा सामान्य वितरण निवडता येईल. या नवीन सेवा जानेवारीपासून सुरू होतील.
हेही वाचा - AI Music Hits Artist Royalties : एआय म्युझिक बूममुळे कलाकारांच्या रॉयल्टीवर होऊ शकतो परिणाम; फिच रेटिंग्जचा इशारा
सध्याच्या परिस्थितीत पार्सल पोहोचवण्यास 3 ते 5 दिवस लागतात, परंतु नवीन जलद वितरण सेवेमुळे ही गती लक्षणीयरीत्या सुधारली जाणार आहे. विशेषतः व्यावसायिक आणि तातडीच्या शिपमेंटसाठी ही सेवा फायदेशीर ठरणार आहे.
हेही वाचा - Facebook Messenger App : Meta चा मोठा निर्णय! 15 डिसेंबरपासून फेसबुकची 'ही' महत्त्वाची सेवा बंद होणार
याशिवाय, सरकारचा उद्देश 2029 पर्यंत टपाल विभागाला फायदेशीर विभाग बनवण्याचा आहे. त्यासाठी विभाग नवीन उत्पादने आणि सेवा सुरू करत असून, या आठ नवीन सेवांमध्ये जलद वितरण सेवाही समाविष्ट आहे. या योजनांमुळे ग्राहकांना जलद आणि प्रभावी सेवा मिळेल तसेच टपाल विभागाच्या कामकाजातही सुधारणा होईल.