Wednesday, June 25, 2025 02:09:12 AM

भिकेला लागलेल्या पाकची दहशतवाद्यांना मात्र खैरात; IMFच्या निधीचा दुरुपयोग सुरुच

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. मसूद अझहरच्या 14 नातेवाइकांचा मृत्यू. शाहबाज शरीफ यांनी प्रत्येकी 1 कोटींचे अनुदान जाहीर केले.

भिकेला लागलेल्या पाकची दहशतवाद्यांना मात्र खैरात imfच्या निधीचा दुरुपयोग सुरुच

नवी दिल्ली: भारताने नुकत्याच पार पडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर कडक कारवाई केली. या कारवाईत जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयासह नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले. या हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 सदस्य ठार झाले. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दहशतवाद्यांच्या वारसांना प्रत्येकी एक कोटी रुपयांचे ‘सांत्वन’ जाहीर करून जगालाच धक्का दिला आहे. मसूद अझहरला एकट्यालाच 14 कोटींचा निधी दिला जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) नुकतेच पाकिस्तानला 1.2 अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर करण्यात आले. हे पैसे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी, आपत्ती निवारणासाठी दिले गेले असताना, पाक सरकारने त्याचा वापर थेट दहशतवाद्यांवर दौलतजादा करण्यासाठी सुरु केला आहे. मसूद अझहरसारख्या UN घोषित दहशतवाद्याला एवढा मोठा निधी दिला जाणे म्हणजे पाकिस्तानचा दहशतवाद्यांवरील अंधविश्वास आणि दुटप्पी भूमिका अधोरेखित करणारी बाब ठरते.

हेही वाचा:भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने Amazon, Flipkart, Etsy आणि इतर कंपन्यांना नोटीस बजावली

‘सुभानअल्लाह’ नावाचा जैशचा मुख्य तळ या हल्ल्यात उद्ध्वस्त झाला होता. तिथेच मसूद अझहरने अनेक वर्षं दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं होतं. त्याच्या कुटुंबाचा नाश झाल्याने त्याने कांगावा केला असला, तरी त्याच्या प्रत्येक हालचालीवर भारताचे सत्त्वगुप्त यंत्रणा सतत लक्ष ठेवून आहेत. युद्धविराम होताच त्याने पुन्हा बहावलपूरच्या परिसरात हालचाली सुरू केल्याचे उपग्रह छायाचित्रांवरून स्पष्ट झाले आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारताने IMF च्या निधीवाटपावर आधीच आक्षेप घेतला होता. पाकिस्तान हा निधी देशातील सामान्य जनतेसाठी वापरणार नाही, तर तो दहशतवाद्यांच्या हाती जाईल, असा इशारा भारताने वेळोवेळी दिला होता. तो आता खरा ठरतो आहे.

पाकिस्तानने दहशतवाद्यांना मदतीचा हात देणं, त्यांच्या तळांची पुन्हा उभारणी करणं आणि निधीची उधळपट्टी करणं ही आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठी धोक्याची घंटा आहे. भारताने केलेल्या कारवाईनंतरही पाकिस्तान अद्याप शहाणा झाला नाही, हे या सर्व घटनांवरून पुन्हा स्पष्ट झाले आहे.

भारताच्या ठाम भूमिकेमुळेच आज जग दहशतवादविरोधात एकत्र येत आहे. पण पाकिस्तान अजूनही दहशतवाद्यांचा झोळीत पैसे टाकण्यात गर्क आहे. हे थांबवायचे असेल, तर आंतरराष्ट्रीय संस्थांनी यापुढे पाकिस्तानला कुठलाही निधी देण्याआधी दोनदा विचार करायला हवा.


सम्बन्धित सामग्री