Padma Awards 2026 List : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून, यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तिमत्वांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध लोकनाट्य तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना त्यांच्या कला क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानासाठी 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्यासोबतच परभणीचे प्रगतशील शेतकरी श्रीरंग लाड यांना कृषी क्षेत्रातील विशेष संशोधनासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. लाड यांनी कापूस पिकाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी केलेले कार्य अत्यंत मोलाचे ठरले आहे. या पुरस्कारांमुळे ग्रामीण महाराष्ट्रातील कला आणि मातीतील संशोधनावर शिक्कामोर्तब झाले आहे.
वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दीपस्तंभ
वैद्यकीय क्षेत्रात अहोरात्र सेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील डॉ. अर्मिडा फर्नांडीस यांनाही 'पद्मश्री' देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी आरोग्य सेवा आणि समाजसेवेच्या माध्यमातून तळागाळातील लोकांसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील भिकल्या लाडक्या धिंडा यांना देखील त्यांच्या विशेष योगदानासाठी हा नागरी सन्मान मिळाला आहे. केंद्र सरकारने यंदा 'अनसंग हिरोज' म्हणजेच पडद्यामागील नायकांना प्राधान्य देत महाराष्ट्रातील या हिऱ्यांचा शोध घेतला आहे. पी. आर. श्रीजेश (हॉकी) यांना 'पद्मभूषण', तर क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनला 'पद्मश्री' जाहीर झाल्याने क्रीडा क्षेत्रातही आनंदाचे वातावरण आहे.
हेही वाचा - Shubhanshu Shukla: कौतुकास्पद! अंतराळात तिरंगा फडकवणारे शुभांशु शुक्ला यांना सर्वोच्च शौर्य पुरस्कार 'अशोक चक्र' जाहीर
पद्म पुरस्कारांचे स्वरूप आणि महत्त्व
पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असून ते पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन श्रेणींमध्ये दिले जातात. कला, समाजसेवा, व्यापार, उद्योग, आरोग्य, साहित्य, शिक्षण आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांत असामान्य कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची यासाठी निवड केली जाते. यंदाच्या यादीत देशभरातील 130 हून अधिक मान्यवरांचा समावेश आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. नितेश राणे आणि इतर नेत्यांनीही या विजेत्यांचे अभिनंदन केले असून, हा सन्मान राज्यासाठी अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,
पद्म पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींची यादी
भगवानदास रायकर (मध्य प्रदेश)
भिकल्या लाडक्या धिंडा (महाराष्ट्र)
ब्रिजलाल भट्ट (जम्मू आणि काश्मीर)
चरण हेमब्रम (ओडिशा)
चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश)
डॉ. पद्मा गुरमेट (जम्मू आणि काश्मीर)
कोल्लक्काइल देवकी अम्मा जी (केरळ)
महेंद्र कुमार मिश्रा (ओडिशा)
नरेश चंद्र देव वर्मा (त्रिपुरा)
ओथुवर तिरुथनी (तामिळनाडू)
रघुपत सिंग (उत्तर प्रदेश)
रघुवीर खेडकर (महाराष्ट्र)
राजस्थानपती कलिअप्पा गौंडर (तामिळनाडू)
सांग्युसांग एस. पोंगेनर (नागालँड)
श्रीरंग देवबा लाड (महाराष्ट्र)
तिरुवरूर बख्तवासलम (तामिळनाडू)
अंके गौडा (कर्नाटक)
आर्मिडा फर्नांडिस (महाराष्ट्र)
डॉ. श्याम सुंदर (उत्तर प्रदेश)
गफ्फारुद्दीन मेवाती (राजस्थान)
खेम राज सुंदरियाल (हरियाणा)
मीर हाजीभाई कासंबाई (गुजरात)
मोहन नगर (मध्य प्रदेश)
नीलेश मांडलेवाला (गुजरात)
आर अँड एस गोडबोले (छत्तीसगड)
राम रेड्डी मामिदी (तेलंगणा)
सिमांचल पात्रो (ओडिशा)
सुरेश हनगवाडी (कर्नाटक)
तेची गुबिन (अरुणाचल प्रदेश)
युनाम जत्रा सिंग (मणिपूर)
बुधरी थाठी (छत्तीसगड)
डॉ. कुमारसामी थंगराज (तेलंगणा)
डॉ. पुननियामूर्ती नटेसन (तामिळनाडू)
हेले वॉर (मेघालय)
इंद्रजित सिंग सिद्धू (चंदीगड)
के. पंजनिवेल (पुडुचेरी)
कैलास चंद्र पंत (मध्य प्रदेश)
नुरुद्दीन अहमद (आसाम)
पोकिला लेकटेपी (आसाम)
आर. कृष्णन (तामिळनाडू)
एस जी सुशीलम्मा (कर्नाटक)
तागा राम भील (राजस्थान)
विश्व बंधू (बिहार)
धर्मिकलाल चुनीलाल पंड्या (गुजरात)
शफी शौक (जम्मू आणि काश्मीर)
हेही वाचा - Gallantry Medals : भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीविरोधात लढणाऱ्या 'या' 31 CBI अधिकाऱ्यांचा देशपातळीवर गौरव; वाचा संपूर्ण यादी