S. Jaishankar On PAK Army: ‘भारताच्या अनेक अडचणींचे मूळ पाकिस्तानी सैन्य…’; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा असीम मुनीर यांच्यावर निशाणा

भारताविरुद्ध वर्षोंपासून सुरू असलेल्या पाकिस्तानी दहशतवादावर बोलताना जयशंकर यांनी थेट प्रश्न उपस्थित केला. दहशतवादी हल्ले, प्रशिक्षण शिबिरे आणि भारताविरुद्धचा वैचारिक द्वेष हे सर्व कुठून येते?

S. Jaishankar On PAK Army: ‘भारताच्या अनेक अडचणींचे मूळ पाकिस्तानी सैन्य…’; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा असीम मुनीर यांच्यावर निशाणा

S. Jaishankar On PAK Army: पाकिस्तानविषयी भारतीय परराष्ट्र धोरणाची स्पष्ट भूमिका अधोरेखित करत, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी एका कार्यक्रमात कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्यांनी ठामपणे सांगितले की भारतातील अनेक ऐतिहासिक आणि चालू समस्या या पाकिस्तानी सैन्यामुळे निर्माण झाल्या आहेत. त्यांनी पाकिस्तानी लष्कराला दहशतवादाची जननी तसेच नवी दिल्लीविरुद्ध खोलवर रुजलेले वैचारिक द्वेषाचे केंद्र असे संबोधले.

दहशतवाद, शत्रुत्व हे सर्व पाकिस्तानी सैन्याकडूनच 

भारताविरुद्ध वर्षोंपासून सुरू असलेल्या पाकिस्तान प्रायोजित दहशतवादावर बोलताना जयशंकर यांनी थेट प्रश्न उपस्थित केला. दहशतवादी हल्ले, प्रशिक्षण शिबिरे आणि भारताविरुद्धचा वैचारिक द्वेष… हे सर्व कुठून येते? त्यांच्या मते, या सर्वाचा उगम एकच पाकिस्तानी सैन्याची विचारधारा आणि त्याचे उद्दिष्ट आहे. ते पुढे म्हणाले की भारताचा आजचा जागतिक दर्जा, क्षमता आणि प्रभाव पाहता स्वतःची पाकिस्तानशी तुलना करणे चुकीचे ठरेल. आपली उंची वेगळी आहे, त्यामुळे तुलना करण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

असीम मुनीर यांच्यावर थेट टीका

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावरही जयशंकर यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, 'जसे चांगले आणि वाईट दहशतवादी असतात, तसेच चांगले आणि कमी दर्जाचे लष्करी नेतेही असतात.' त्यांच्या या वक्तव्याने पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्वाच्या दुटप्पी भूमिकेवर थेट प्रकाश टाकला.

हेही वाचा – Indigo Flight Cancellation : एकीकडे सिंगापूरमध्ये प्रपोज करण्याचा 7 लाखांचा प्लान फसला; तर, दुसरीकडे उच्चायुक्तही अडकले

‘ऑपरेशन सिंदूर’वर प्रतिक्रिया 

दरम्यान, ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने अधिक कडक पावले उचलू शकली असती का? असे विचारले असता जयशंकर यांनी भारतीय भूमिकेचे समर्थन करताना सांगितले की भारताची कार्यपद्धती नियम, पारदर्शकता आणि लोकांसमोरील जबाबदारी यावर आधारित आहे. आपण जे काही करतो ते तत्त्वांवर आधारित असते. कोणतीही कारवाई केली तर त्याचा हिशोब लोकांना द्यावा लागतो, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. 

हेही वाचा – Indians Deported From US: अमेरिकेत भारतीयांवर कारवाई! सरकारकडून डंकी रूट बंद; 2025 मध्ये अमेरिकेतून 3155 भारतीय हद्दपार

ऑपरेशन सिंदूर काय होते?

मे महिन्यात पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी 24 क्षेपणास्त्र हल्ले केले. या कारवाईत 70 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. हल्ल्यानंतर पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर अंधाधुंद गोळीबार केला, ज्याला भारताने मनमानी आणि बिनबुडाचे कृत्य म्हटले. त्यानंतर 10 मे रोजी दोन्ही देश युद्धबंदीवर सहमत झाले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number