Thursday, July 17, 2025 01:51:43 AM

प्रवाशांचा जीव पुन्हा धोक्यात! हिंडन विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात तांत्रिक बिघाड; टेकऑफ रद्द

विमानतळ प्राधिकरणाच्या मते, एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान क्रमांक IX 1511 उड्डाण थांबवण्यात आले आहे. हे विमान गाझियाबादहून कोलकाताला जाणार होते.

प्रवाशांचा जीव पुन्हा धोक्यात हिंडन विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात तांत्रिक बिघाड टेकऑफ रद्द
Air India Express flight
Edited Image

गाझियाबाद: उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील हिंडन विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आलं आहे. यामुळे रविवारी दुपारी प्रवाशांनी भरलेले एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे उड्डाण थांबवण्यात आले. टेकऑफपूर्वीच हा तांत्रिक बिघाड आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर उड्डाण थांबवण्यात आले आणि प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले. विमानतळ प्राधिकरणाच्या मते, एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान क्रमांक IX 1511 उड्डाण थांबवण्यात आले आहे. हे विमान गाझियाबादहून कोलकाताला जाणार होते, परंतु नंतर त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. त्यानंतर या विमानाचे उड्डाण थांबवण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, हे विमान 1 तास धावपट्टीवर उभे होते. अभियंते या विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम करण्यात व्यस्त होते. विमानतळ प्राधिकरण स्वतः घटनास्थळी उपस्थित होते. तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यानंतरच विमानाला उड्डाण करण्याची परवानगी दिली जाईल, असे प्राधिकरणाचे म्हटलं आहे.

हेही वाचा - मोठी बातमी! विजय रुपानी यांच्या मृतदेहाची ओळख पटली; DNA जुळला

पायलटमुळे वाचले 100 प्रवाशांचे प्राण - 

या विमानात सुमारे 100 प्रवासी कोलकात्याला जात होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, पायलटने विमान सुरू करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला काही बिघाड आढळला. त्यानंतर त्यांनी स्थानिक विमानतळ प्राधिकरणाला याची माहिती दिली. त्याच वेळी, या माहितीमुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. विमानातील क्रू मेंबर्सनी त्यांना कसे तरी शांत केले आणि एक एक करून विमानातून खाली आणले.

हेही वाचा - केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू, मृतांमध्ये महाराष्ट्रातील कुटुंबाचाही समावेश

एअर इंडिया एक्सप्रेसने जारी केले निवेदन - 

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत एअर इंडिया एक्सप्रेसकडून निवेदन आले आहे. तांत्रिक बिघाडामुळे आमचे कोलकाता-हिंद विमान नियोजित वेळेपेक्षा खूप उशिरा उड्डाण करेल, असे त्यांनी म्हटले आहे. या समस्येमुळे प्रवाशांना त्यांच्या तिकिटांची संपूर्ण रक्कम परत केली जाईल. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने दिलगीर व्यक्त केली आहे. 
 


सम्बन्धित सामग्री