Wednesday, July 09, 2025 10:09:47 PM

मोठी बातमी! विजय रुपानी यांच्या मृतदेहाची ओळख पटली; DNA जुळला

विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटल्याने त्यांचे पार्थिव रुग्णालयातून राजकोटला आणले जाईल, असे सांगितले जात आहे.

मोठी बातमी विजय रुपानी यांच्या मृतदेहाची ओळख पटली dna जुळला
Former Gujarat CM Vijay Rupani
Edited Image

अहमदाबाद: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे अहमदाबाद येथे विमान अपघातात निधन झाले. आता त्यांचा डीएनए मॅच झाल्याची पुष्टी झाली आहे. गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी डीएनए मॅच झाल्याची पुष्टी केली आहे. तसेच गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी रुग्णालयात माध्यमांशी बोलताना सांगितले की, विजय रुपानी यांचे डीएनए मॅच झाले आहे, त्यांच्या कुटुंबियांना याबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्यांचे कुटुंबिय लवकरच येथे पोहोचतील, त्यानंतर ते ज्या पद्धतीने सांगतील त्यानुसार विजय रुपानी यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटल्याने त्यांचे पार्थिव रुग्णालयातून राजकोटला आणले जाईल, असे सांगितले जात आहे. भाजपचे प्रवक्ते राजूभाई ध्रुव यांनी शनिवारी सांगितले होते की, माजी मुख्यमंत्र्यांचे पार्थिव ग्रीनलँड स्क्वेअरवरून त्यांच्या निवासस्थानी प्रकाश सोसायटीत आणले जाईल. एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमानाच्या उड्डाणानंतर काही वेळातच अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 241 मृतांमध्ये रुपानी यांचाही समावेश होता.

हेही वाचा - एअर इंडियाचा मृतांच्या कुटुंबियांना मदतीचा हात! अपघातातील पीडितांच्या कुटुंबाला देणार प्रत्येकी 25 लाख रुपये

गुजरातहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा 12 जून 2025 रोजी अपघात झाला. आतापर्यंत या अपघातात 274 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. परंतु आतापर्यंत यापैकी फक्त 31 मृतदेहांची ओळख पटली आहे आणि 19 मृतदेह नातेवाईकांना देण्यात आले आहेत. हा अपघात इतका भयानक होता की मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए सॅम्पलिंग केले जात आहे. डीएनए चाचणीनंतरच मृतदेह नातेवाईकांना दिले जातील.

हेही वाचा -Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात 

एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानात एकूण 242 लोक होते, ज्यात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स होते. 242 लोकांपैकी 241 जणांचा मृत्यू झाला. तथापी, यात केवळ एक प्रवासी विश्वास कुमार रमेश यांचा जीव वाचला. हा प्रवासी आपत्कालीन एक्झिटजवळील सीट 11ए वर बसला होता.
 


सम्बन्धित सामग्री