मुंबई: अहमदाबाद विमान अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी दिलासादायक बातमी आहे. टाटा समूहानंतर आता एअर इंडियाने शनिवारी मृतांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपयांची अंतरिम आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. ही रक्कम टाटा सन्सने आधीच जाहीर केलेल्या 1 कोटी रुपयांच्या भरपाई रकमेव्यतिरिक्त असेल. गुरुवारी अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमानाचा अपघात झाला. या अपघातात किमान 270 जणांना आपला जीव गमवावा लागला.
एअर इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, 'आम्ही मृतांच्या कुटुंबियांना आणि वाचलेल्यांना तात्काळ आर्थिक मदतीसाठी 25 लाख रुपयांची अंतरिम मदत जाहीर करतो.' तथापी, एअर इंडियाने स्पष्ट केलं आहे की, ही रक्कम टाटा सन्सने यापूर्वी जाहीर केलेल्या 1 कोटी रुपयांच्या व्यतिरिक्त आहे.
हेही वाचा - Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात
बाधित कुटुंबांना मदत करण्यासाठी 200 हून अधिक प्रशिक्षित सहाय्यक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक कुटुंबासाठी एक समर्पित सहाय्यक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. हा सहाय्यक कर्मचारी समुपदेशन आणि इतर सेवा प्रदान करेल. आमच्या टीम कुटुंबे आणि अधिकाऱ्यांसोबत काम करत आहेत, असंही कॅम्पबेल विल्सन यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा - चमत्कार म्हणावा की...योगायोग! 27 वर्षात दोन विमान अपघात केवळ 11 A सीटवर बसलेल्या प्रवाशाचा वाचला जीव
टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी गुरुवारी सांगितले होते की, 'या अपघातात जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला टाटा समूहाकडून 1 कोटी रुपयांची मदत दिली जाईल. हे पाऊल बाधित कुटुंबांसाठी एक मोठा आधार ठरेल.'