Thai actor-singer Ruangsak Loychusak and Vishwash Kumar Ramesh
Edited Image
नवी दिल्ली: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या विमानात केबिन क्रूसह एकूण 242 प्रवासी होते, त्यापैकी 241 जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी अपघातात फक्त विमानाच्या 11अ सीटवर बसलेल्या प्रवाशाचा जीव वाचला. तथापी, 27 वर्षांपूर्वी थायलंडमध्येही असाच एक विमान अपघात झाला होता, ज्यामध्ये वाचलेला व्यक्ती 11 अ सीटवरचं बसलेली होती. टेलिग्राफ इंडियाच्या बातमीनुसार, ही व्यक्ती थायलंडचा अभिनेता आणि गायक जेम्स रुआंगसाक लोयचुसाक आहे.
आणखी एका विमान अपघात 11अ सीटवर बसलेल्या प्रवाशाचे वाचले होते प्राण -
प्राप्त माहितीनुसार, 1998 मध्ये लॉयचुसाकने थाई एअरवेजच्या फ्लाइट TG261 ने उड्डाण केले होते. हे फ्लाइट बँकॉकहून येत होते. हे विमान दक्षिण थायलंडच्या सुरत थानी शहरात उतरणार होते. परंतु लँडिंग दरम्यान, फ्लाइट हवेत थांबली आणि नंतर क्रॅश झाली. या विमानात 146 लोक होते, त्यापैकी 101 जणांचा मृत्यू झाला. वाचलेल्यांमध्ये लॉयचुसॅक देखील होते. लॉयचुसॅक विमानाच्या 11अ सीटवर बसले होते. अहमदाबाद विमान अपघातातून वाचलेल्या व्यक्तीची कहाणी जेव्हा माध्यमांमध्ये चर्चेत आली तेव्हा लॉयचुसॅक यांनाही याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराची सोशल मीडियावर माहिती दिली.
हेही वाचा - Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! DNA नमुन्यांद्वारे 16 मृतदेहांची ओळख पटली
लॉयचुसॅक यांनी सोशल मीडियावर दिली माहिती -
दरम्यान, लॉयचुसॅक यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. अहमदाबाद विमान अपघातात ब्रिटिश-भारतीय नागरिक विश्वास कुमार रमेश यांचा जीव वाचला आहे. विश्वास कुमार रमेश देखील विमानाच्या 11अ सीटवर बसले होते आणि लॉयचुसॅकप्रमाणे ते अपघातानंतर स्वतःहून चालत आले. तथापि, हा केवळ योगायोग आहे, दोन्ही अपघातांच्या परिस्थितीत खूप फरक आहे. थाई एअरवेजचे विमान एअरबस ए 310 होते, तर एअर इंडियाचे विमान एआय-171 हे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान होते. या दोन्ही विमानांमधील 11अ सीटच्या स्थान, डिझाइन आणि लेआउटमध्ये खूप फरक आहे.
हेही वाचा - मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातातील मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनाही मिळणार 1 कोटी रुपयांची भरपाई
याशिवाय, 27 वर्षांपूर्वी घडलेल्या या विमान अपघातातून लॉयचुसॅक यांच्याशिवाय अनेकजण वाचले होते. परंतु, अहमदाबाद विमान अपघातात केवळ विश्वास कुमार हा एकमेव प्रवाशी अगदी चमत्कारिकरित्या वाचला आहे. तथापि, या प्रवाशाने आपण विमानातून उडी मारली नसल्याचं सांगितले. विश्वास कुमार कॉलेजच्या इमारतीजवळील मोकळ्या जागेत सीटसह फेकले गेले होते.