Wednesday, July 09, 2025 08:42:08 PM

Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! DNA नमुन्यांद्वारे 16 मृतदेहांची ओळख पटली

विमानातील 16 जणांचे डीएनए नमुने कुटुंबियांशी जुळल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत एकूण 9 जणांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत.

ahmedabad plane crash मोठी बातमी dna नमुन्यांद्वारे 16 मृतदेहांची ओळख पटली
Edited Image

अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबाद येथे 12 जून रोजी मोठा विमान अपघात झाला. या अपघातात विमानातील 242 आणि अपघातस्थळावरील 56 जणांचा मृत्यू झाला. एअर इंडिया विमान अपघाताच्या 28 तासांत विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला. ब्लॅक बॉक्सची तपासणी केल्यानंतरच शेवटच्या क्षणी विमानात काय घडत होते हे समजू शकणार आहे. दरम्यान, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे नमुने आणि त्यांच्या नातेवाईकांचे नमुने जुळवून मृतांची ओळख पटवली जात आहे. अशा परिस्थितीत, आता मोठी बातमी समोर येत आहे. विमानातील 16 जणांचे डीएनए नमुने कुटुंबियांशी जुळल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत एकूण 9 जणांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत.

DNA चाचणीद्वारे करण्यात येत आहे मृतांची ओळख -  

अहमदाबाद विमान अपघातातील केवळ एक प्रवासी सोडता इतर सर्वांचा मृत्यू झाला आहे. विमानातील सर्व प्रवासी गंभीरपणे जळाले होते. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटवणे खूप कठीण झाले आहे. या कारणास्तव, मृतांच्या नातेवाईकांना अहमदाबादला बोलावण्यात आले आहे, जेणेकरून डीएनए चाचणीद्वारे प्रवाशांची ओळख पटवता येईल. आता डीएनए चाचणीद्वारे 16 जणांची ओळख पटवण्यात आली असून त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपवण्यात आले आहेत.

हेही वाचा - मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातातील मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनाही मिळणार 1 कोटी रुपयांची भरपाई

दरम्यान, शनिवारी अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, शोध आणि पुनर्प्राप्ती पथके सलग तिसऱ्या दिवशी ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याचे काम करत आहेत. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत, बचाव पथकाला ढिगाऱ्यात आणखी 25 मृतदेह सापडले. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉ. धवल गामेती यांनी सांगितले की, आतापर्यंत 270 मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत. विमानातून वाचलेल्या एकमेव प्रवाशाची प्रकृती स्थिर असून त्याला लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे. 

हेही वाचा - Vijay Rupani: माजी मुख्यमंत्री विजय रूपाणींचा मृतदेह शोधण्यात अडचणी

तथापी, शुक्रवारी तपास पथकाला अपघातस्थळाजवळील बीजे मेडिकल कॉलेजच्या छतावरून विमानाचा डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर म्हणजेच ब्लॅक बॉक्स सापडला. त्यामुळे आता अपघातामागील खरे कारण लवकरच उघड होणार आहे. तसेच भारताच्या एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने सांगितले की, त्यांनी पूर्ण ताकदीने डेटा गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. यूकेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे पॉल फ्रॉम यांच्या मते, ब्लॅक बॉक्स इंजिनची स्थिती आणि फ्लाइट कंट्रोल सेटिंग्जबद्दल माहिती देईल. तसेच व्हॉइस रेकॉर्डर कॉकपिटमधील संभाषणे उघड करेल. 
 


सम्बन्धित सामग्री