Sunday, July 13, 2025 11:12:24 AM

Vijay Rupani: माजी मुख्यमंत्री विजय रूपाणींचा मृतदेह शोधण्यात अडचणी

माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृतदेह शोधण्यात अडचणी निर्माण होत आहेत. कुटुंबीयांचा डीएनए जुळत नसल्याने त्यांचा मृतदेहाचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत.

vijay rupani माजी मुख्यमंत्री विजय रूपाणींचा मृतदेह शोधण्यात अडचणी

अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या ड्रिमलायनर विमानाचा मोठा अपघात झाला. या अपघातात विमानातील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून एक प्रवासी बचावला आहे. या विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृत्यू झाला आहे. या विमान अपघातानंतर मृतांची ओळख पटण्यासाठी डीएनए टेस्ट केली जात आहे. मात्र माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मृतदेह शोधण्यात अडचणी निर्माण होत आहेत. कुटुंबीयांचा डीएनए जुळत नसल्याने त्यांचा मृतदेहाचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. 

अहमदाबादमध्ये 12 जून रोजी मोठा विमान अपघात झाला. विमान उड्डाणानंतर फक्त 31 सेंकदात हा अपघात झाल्याने बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. विमान एका रुग्णालयावर कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. या अपघातात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून तेथील 33 जणांचा मृत्यू झाला आहे. विमान दुर्घटनेत मृतांचा आकडा 274 वर पोहोचला आहे. डीएनए टेस्टद्वारे मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे. सात मृतदेहांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये 33 सामान्य नागरिक आहेत. मात्र गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. कुटुंबियांचा डीएनए जुळत नसल्याने शोधकार्यात अडचणी निर्माण होत आहेत. 

हेही वाचा : बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा 7वा दिवस, महत्त्वाची घोषणा करणार

अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत मोठा स्फोट झाल्याने मृतदेह जळाले. त्यामुळे मृतांची ओळख पटणे कठीण झाले. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांची डीएनए टेस्ट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मृतांची ओळख पटण्यास मदत झाली. मात्र विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटण्यास अडचणी येत आहेत. विजय रुपाणी यांच्या कुटुंबीयांचा डीएनए जुळत नसल्याने त्यांचा मृतदेह सापडण्यास समस्या उद्भवत आहेत. अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या कासोती भवनात डीएनए नमुने घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे कासोती भवन बी.जे. मेडिकल कॉलेजच्या तळमजल्यावर आहे.

रुपाणींचा लकी नंबर 1206
रुपाणी नेहमी 1206 हा अंक शुभ मानत असतं. आता याच लकी नंबरच्या तारखेला रुपाणी यांचा मृत्यू झाला आहे. हा लकी नंबर त्यांच्या आयुष्यातील अनलकी नंबर ठरला. विजय रुपाणी यांनी वर्षानुवर्षे त्यांच्या सर्व वाहनांचा नोंदणी क्रमांक सारखाच ठेवला होता. माजी मुख्यमंत्री रुपाणी यांनी 1206 हा त्यांचा लकी नंबर मानला होता, परंतु आता तो त्यांच्या शेवटच्या प्रवासाची तारीख, 12 जून (12/06) बनला आहे. त्यांच्या वाहनांचा नोंदणी क्रमांक देखील 1206 होता. राजकोटमधील स्थानिक आणि पत्रकारांच्या मते, रूपाणींच्या स्कूटर आणि कारचा नोंदणी क्रमांक 1206 हाच होता. मात्र, आता हा नंबर भारताच्या इतिहासातील काळा दिवस मानला जात आहे.


सम्बन्धित सामग्री