Tuesday, November 18, 2025 03:21:45 AM

INS Vikrant: पंतप्रधान मोदींनी आयएनएस विक्रांतवर जवानांसोबत साजरी केली दिवाळी

पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी आयएनएस विक्रांतवर भारतीय नौदलाच्या जवानांसोबत दिवाळीचा प्रकाशोत्सव साजरा करत संरक्षण दलाच्या पराक्रमाला विशेष अभिवादन केले.

ins vikrant पंतप्रधान मोदींनी आयएनएस विक्रांतवर जवानांसोबत साजरी केली दिवाळी

INS Vikrant: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आयएनएस विक्रांतवर भारतीय नौदलाच्या जवानांसोबत दिवाळीचा प्रकाशोत्सव साजरा करत संरक्षण दलाच्या पराक्रमाला विशेष अभिवादन केले. या वेळी त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे उल्लेख करताना मोदींनी सांगितले की, या मोहीमेने काही दिवसांतच शत्रूला गुडघे टेकायला भाग पाडले. पंतप्रधानांनी आपल्या संबोधनात आयएनएस विक्रांतला केवळ युद्धनौका म्हणून न पाहता भारताच्या कठोर परिश्रम, प्रतिभा, प्रभाव आणि वचनबद्धतेचे प्रतीक म्हणून ओळखावे असे म्हटले. काल आयएनएस विक्रांतवर घालवलेली रात्र वर्णनात कठीण आहे. तुमचा उत्साह आणि देशभक्तीची ऊर्जा मला भावली, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी जवानांच्या गाण्यांमधील ‘ऑपरेशन सिंदूर’च्या उल्लेखाला विशेष महत्त्व दिले आणि युद्धभूमीवरची भावना अनुभवल्याची भावना व्यक्त केली.

हेही वाचा - 8th Pay Commission Approved: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पगारा संदर्भातील मोठी बातमी; 8वा वेतन आयोगाचा ‘तो’ निर्णय कधी जाहीर होणार?

पंतप्रधानांनी सांगितले की ऑपरेशन सिंदूरमध्ये जमिनीवर, हवाई आणि सागरी तीनही दलांमधील असाधारण समन्वय दिसून आला. ज्यामुळे आज परिस्थिती इतकी घाबरवणारी बनली की शत्रूला जणू काही आत्मसमर्पणाच्या वाटेवर आणण्यात आले. त्यांनी ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्राला विशेष उल्लेख केला. ते म्हणाले की ब्राह्मोसने पराक्रम दाखवला असून अनेक देश त्यात रस दाखवत आहेत. ब्राह्मोसचे नाव अनेकांच्या मनात भीती निर्माण करते. केंद्रसरकारचे उद्दिष्ट भारताला जागतिक पातळीवर संरक्षण निर्यातात आघाडीवर आणण्याचे असल्याचेही यावेळी मोदींनी नमूद केले. 

हेही वाचा - Gold Price Today: दिवाळीच्या दिवशी सोन्याची चमक झाली फिकी, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

या प्रसंगी पंतप्रधानांनी संरक्षणदलाबरोबरच देशाच्या आंतरिक सुरक्षा लढ्यांचाही गौरव केला. ते म्हणाले की माओवादी हिंसाचार आता केवळ 11 जिल्ह्यांपुरता मर्यादित झाला असून, पोलीस आणि सुरक्षा दलांच्या प्रयत्नांमुळे हा फैलाव लवकरच पूर्णपणे संपवला जाईल असा त्यांचा विश्वास आहे. त्यांनी नक्षलवाद्यांशी झुंज देणाऱ्या जवानांचे मनापासून आभार मानले. पंतप्रधानांनी राष्ट्रसेवकांचे आणि स्थानिक भूमिपुत्रांचे गुणगान करत भारत भूमीचे महत्त्व अधोरेखित केले.

दरम्यान, आयएनएस विक्रांतवर दिवाळी साजरी करण्याची परंपरा पंतप्रधानांनी आत्मीयतेने स्वीकारली आणि जवानांबरोबर झालेल्या संवादातून देशाच्या संरक्षण क्षमतेबाबत आत्मविश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाने भारतीय सैन्याच्या तैयारीचे आणि आधुनिक संरक्षणक्षेत्रातील वाढत्या क्षमतेचा संदेश राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यास मदत होणार आहे.  
 


सम्बन्धित सामग्री