Thursday, July 17, 2025 01:46:40 AM

पंतप्रधान मोदींना घानाचा 'ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' पुरस्कार प्रदान

घानाच्या विशिष्ट प्रशासन कौशल्य आणि प्रभावी जागतिक नेतृत्व यासाठी घानाचे अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांनी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान केला.

पंतप्रधान मोदींना घानाचा ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना पुरस्कार प्रदान
PM Modi Receives Ghana award
Edited Image

PM Modi Conferred With Ghana Award: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाना सरकारने देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना' प्रदान केला आहे. घानाने मोदींना हा सन्मान त्यांच्या कणखर नेतृत्व आणि उत्कृष्ट प्रशासनासाठी दिला आहे. पंतप्रधान मोदींनी हा सन्मान भारत आणि घाना यांच्यातील मजबूत मैत्री, सांस्कृतिक वारसा आणि तरुणांच्या उज्ज्वल भविष्याला समर्पित केला.

पंतप्रधान मोदींना घानाकडून मिळाला सर्वोच्च सन्मान - 

घानाच्या विशिष्ट प्रशासन कौशल्य आणि प्रभावी जागतिक नेतृत्व यासाठी घानाचे अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांनी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान केला. मोदींच्या घानाच्या पहिल्या भेटीदरम्यान त्यांना हा सन्मान मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घाना भेटीदरम्यान, भारत आणि घाना यांच्यातील द्विपक्षीय संबंध 'व्यापक भागीदारी' पर्यंत उंचावले आहेत. या भेटीदरम्यान, विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी चार महत्त्वाचे करार करण्यात आले. 

पंतप्रधान मोदी आणि घानाचे अध्यक्ष यांच्यात बैठक - 

दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि घानाचे अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांनी अक्रा येथील ज्युबिली हाऊस येथे उच्चस्तरीय बैठक घेतली, त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत निवेदन दिले. तीन दशकांत भारतीय पंतप्रधानांचा घानाचा हा पहिलाच राजकीय दौरा आहे. या बैठकीत द्विपक्षीय सहकार्य नवीन क्षेत्रांमध्ये विस्तारित करण्यासाठी एकमत झाले. व्यापार, गुंतवणूक, शेती, आरोग्य, डिजिटल तंत्रज्ञान, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रात सहकार्याला प्राधान्य देण्यात आले. भारताने डिजिटल पेमेंट सिस्टम (यूपीआय), औषध सुविधा (जन औषधी), कौशल्य विकास आणि लस उत्पादनातील अनुभव सामायिक करण्याचा प्रस्ताव मांडला. तसेच, भारत-समर्थित पायाभूत सुविधा प्रकल्प आणि क्षमता निर्माण कार्यक्रमांना अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला.

हेही वाचा मोठी बातमी! पाकिस्तानी न्यूज चॅनेल्स आणि स्टार्सच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरील बंदी उठवली

चार सामंजस्य करारांवर स्वाक्षरी - 

याशिवाय, बैठकीत चार सामंजस्य करारांची देवाणघेवाण झाली. यामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण, मानकीकरणात सहकार्य, पारंपारिक वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आणि परराष्ट्र मंत्रालयांमधील संयुक्त आयोगाच्या संस्थात्मक बैठकांचा समावेश आहे. या करारांचे उद्दिष्ट दोन्ही देशांमधील सतत संवाद आणि सहकार्य सुनिश्चित करणे आहे.

हेही वाचा - शेख हसीना यांना मोठा धक्का! न्यायालयाने सुनावली 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

तथापी, घानाचा सन्मान स्वीकारताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा पुरस्कार केवळ त्यांचा नाही तर हा 140 कोटी भारतीयांचा आहे. त्यांनी हा पुरस्कार भारत आणि घानामधील ऐतिहासिक संबंध, तरुणांच्या आकांक्षा आणि दोन्ही देशांच्या सांस्कृतिक विविधतेला समर्पित केला. हा सन्मान भारत-घाना मैत्री आणखी मजबूत करण्याची जबाबदारी देखील देतो. भारत नेहमीच घानाच्या लोकांसोबत एक खरा मित्र आणि विकास भागीदार म्हणून उभा राहील, असा विश्वासही यावेळी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. 
 


सम्बन्धित सामग्री