Monday, November 17, 2025 06:51:43 PM

शेख हसीना यांना मोठा धक्का! न्यायालयाने सुनावली 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

हसीना यांना 6 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने बुधवारी बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधानांना अवमान प्रकरणात ही शिक्षा सुनावली आहे.

शेख हसीना यांना मोठा धक्का न्यायालयाने सुनावली 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा
Sheikh Hasina
Edited Image

ढाका: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना कोर्टाकडून मोठा झटका बसला आहे. हसीना यांना 6 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने बुधवारी बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधानांना अवमान प्रकरणात ही शिक्षा सुनावली आहे. 

हेही वाचा - दलाई लामांचा उत्तराधिकारी कधी निवडला जाईल? धार्मिक नेत्याने केला खुलासा

'ढाका ट्रिब्यून' वृत्तपत्राने म्हटले आहे की न्यायाधीश मोहम्मद गुलाम मुर्तझा मजूमदार यांच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला आहे. 11 महिन्यांपूर्वी पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतर आणि देश सोडून गेल्यानंतर अवामी लीगच्या नेत्याला एखाद्या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आल्याची ही पहिलीच वेळ आहे. शेख हसीना सध्या भारताच्या आश्रयास आहेत.

हेही वाचा - लग्नानंतर जेफ बेझोसने केले 'पजामा पार्टी'चे आयोजन; पाहुण्यांना दिले 'हे' खास गिफ्ट्स

शेख हसीनांच्या पक्षावर बंदी - 

यापूर्वी, अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगवर बांगलादेशमध्ये बंदी घातली आहे. युनूस यांनी दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत ही कारवाई केली. तथापी, शेख हसीना यांच्याविरोधात अनेक प्रकरणांमध्ये खटले सुरू आहेत. हसीनांवर भ्रष्टाचारापासून ते खूनांपर्यंतचे गंभीर आरोप आहेत. बांगलादेशच्या युनूस सरकारने अनेक वेळा भारताला शेख हसीनांना परत पाठवण्याची विनंती केली आहे. परंतु, भारत सरकारने या विनंत्यांना प्रतिसाद दिलेला नाही.
 


सम्बन्धित सामग्री