Wednesday, January 14, 2026 12:25:01 PM

EVM Controversy: 'पंतप्रधान मोदी EVM हॅक करत नाहीत, तर ते...'; कंगना रणौत लोकसभेत नेमंक काय म्हणाली?

ईव्हीएममध्ये छेडछाड होत असल्याचा विरोधकांचा आरोप फेटाळताना त्यांनी म्हटले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी ईव्हीएम हॅक करत नाहीत, तर ते थेट लोकांची मने हॅक करतात.”

evm controversy पंतप्रधान मोदी evm हॅक करत नाहीत तर ते कंगना रणौत लोकसभेत नेमंक काय म्हणाली

Kangana Ranaut On EVM Controversy: लोकसभेतील निवडणूक सुधारणांवरील चर्चेमध्ये भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला. ईव्हीएममध्ये छेडछाड होत असल्याचा विरोधकांचा आरोप फेटाळताना त्यांनी म्हटले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी ईव्हीएम हॅक करत नाहीत, तर ते थेट लोकांची मने हॅक करतात.”

काँग्रेसचा ईव्हीएम मुद्दा, राहुल गांधींचा हल्लाबोल

9 डिसेंबरला सुरू झालेल्या चर्चेदरम्यान काँग्रेसने ईव्हीएमबाबत प्रचंड संशय असल्याचे सांगत मतपत्रिका पद्धतीकडे परत जाण्याची मागणी केली. राहुल गांधी यांनीही सरकारवर निवडणूक आयोगाशी संगनमत असल्याचा आरोप केला आणि सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.

हेही वाचा - Shashi Tharoor: शशी थरूर यांचा वीर सावरकर पुरस्कार स्वीकारण्यास नकार; आयोजकांवर टीका करत म्हणाले, 'मला कोणतीही...

मतपेट्या पळवून नेण्याचा इतिहास तुमचा आहे - कंगना  

यावर प्रतिक्रिया देताना मंडी मतदारसंघाच्या खासदार कंगनाने काँग्रेसला टोला लगावला. त्यांनी म्हटलं की, 'जुनी मतपत्रिका पद्धतीच सर्वोत्तम होती असा दावा विरोधक करतात, पण त्या काळातच सर्वाधिक गडबड होत असे. मतपेट्या पळवण्याचा इतिहास कुणाचा आहे हे संपर्ण देशाला माहिती आहे.' राहुल गांधींवर बोलताना कंगना म्हणाली की, 'काल सभेत राहुल गांधी काय बोलत होते याचा त्यांनाच पत्ता नव्हता. ‘खादीला धागा, धाग्याला कापड’ अशा उदाहरणांतून त्यांनी विषयच भरकटवला.'

हेही वाचा - Vishal Dadlani : 'आपल्या टॅक्सच्या पैशांतून संसदेत चर्चा, एका मिनिटाची किंमत अडीच लाख'; वंदे मातरमवर तब्बल दहा तास झालेल्या चर्चेबाबत विशाल दादलानीचं परखड मत

‘एक राष्ट्र, एक निवडणुकी’चे समर्थन

कंगनाने ‘One Nation, One Election’ या प्रस्तावालाही जोरदार पाठींबा दिला. वारंवार निवडणुका झाल्याने खर्च आणि प्रशासनिक ताण वाढतो, त्यामुळे देशासाठी एकत्रित निवडणूक प्रक्रिया फायदेशीर ठरेल, असंही कंगनाने म्हटलं. तिने ही संपूर्ण प्रक्रियेला लोकशाहीचा उत्सव असल्याचं सांगत काँग्रेसवर जोरदार टीका केली.  
 


सम्बन्धित सामग्री