Monday, February 17, 2025 01:36:04 PM

pm narendra modi took holy dip in triveni sangam
MahaKumbh Mela 2025 : हातात रुद्राक्षांची माळ घेऊन प्रार्थना; पवित्र त्रिवेणी संगमात पंतप्रधान मोदींनी केले स्नान

Narendra Modi at Mahakumbh Mela 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात पोहोचले. त्यांनी नदीत गुडघाभर पाण्यात उभे राहून हातात रुद्राक्षांची माळ घेऊन प्रार्थना केली.

mahakumbh mela 2025   हातात रुद्राक्षांची माळ घेऊन प्रार्थना पवित्र त्रिवेणी संगमात पंतप्रधान मोदींनी केले स्नान

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत कोट्यवधी भारतीयांनी पवित्र स्नान केले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक वातावरणात पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले. प्रयागराज येथे  पोहोचल्यानंतर त्यांनी त्रिवेणी संगमाच्या दिशेने बोटीने प्रवास केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सकाळी प्रयागराज येथे पोहोचले. त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांचा संगम असलेल्या त्रिवेणी संगमापर्यंत बोटीने प्रवास केला. त्यांनी नदीत गुडघ्यापर्यंत पाण्यात उभे राहून रुद्राक्षांच्या माळा धरून प्रार्थना केली. तसेच, सूर्यदेवाला ओंजळीत नदीचे पाणी घेऊन अर्घ्य अर्पण केले. त्यानंतर त्रिवेणी संगमात पवित्र अमृतस्नान केले.

हेही वाचा - 'ती काही फार मोठी घटना नव्हती', भाजप खासदार हेमा मालिनींचे महाकुंभातील चेंगराचेंगरीवर वक्तव्य; 30 जणांचा झाला मृत्यू

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना पंतप्रधान बुधवारी प्रयागराज येथे आले. पौष पौर्णिमेला (13 जानेवारी) सुरू झालेला महाकुंभ 2025 हा जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक कार्यक्रम आहे आणि जगभरातील भाविक येथे येतात. हा महाकुंभमेळा 26 फेब्रुवारी रोजी संपेल.

असा होता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पेहराव
पंतप्रधान मोदींनी भगव्या रंगाचा स्वेटशर्ट आणि ट्रॅकसूट परिधान केला होता. त्यांनी त्रिवेणी संगमाच्या पाण्यात उभे राहून हातात रुद्राक्षाची माळ धरून प्रार्थना केली. त्याआधी नेव्ही ब्लू कुर्ता, काळे जॅकेट आणि हिमाचली लोकरीची टोपी घालून आरती केली.

हेही वाचा - राहुल द्रविडची रिक्षाचालकाशी भररस्त्यात वादावादी; कारला रिक्षाची धडक लागल्याने नाराज, VIDEO व्हायरल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धार्मिक स्नान केल्यानंतर, पंतप्रधान मोदी अनेक आखाड्यांमधील संतांच्या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी रवाना झाले आहेत.