Monday, November 17, 2025 06:31:43 AM

Aircraft Collapses in Farrukhabad: फर्रुखाबादमध्ये टेकऑफदरम्यान खाजगी विमान कोसळले; सर्व प्रवासी सुरक्षित

विमान धावपट्टीवरून घसरत जवळच्या झुडपात जाऊन कोसळले, मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

aircraft collapses in farrukhabad फर्रुखाबादमध्ये टेकऑफदरम्यान खाजगी विमान कोसळले सर्व प्रवासी सुरक्षित

Aircraft Collapses in Farrukhabad: उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद हवाई पट्टीवर गुरुवारी सकाळी टेकऑफ दरम्यान एक खाजगी विमान कोसळण्याची घटना घडली. विमान धावपट्टीवरून घसरत जवळच्या झुडपात जाऊन कोसळले, मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या खाजगी जेटमध्ये डीएमडी अजय अरोरा, एसबीआयचे प्रमुख सुमित शर्मा, डीपीओ राकेश टिकू आणि दोन वैमानिक कॅप्टन नसीब वमल आणि प्रतीक फर्नांडिस हे उपस्थित होते. विमानाने उड्डाण करताना अचानक नियंत्रण गमावले आणि काही सेकंदांतच तोल जाऊन अपघात झाला.

हेही वाचा - Bhushan Gavai Video : भूषण गवई यांच्याबरोबर न्यायालयात नक्की काय घडलं? व्हिडीओ समोर

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. एसडीएम, डीएसपी, अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव व तपासकार्य सुरू केले. अधिकाऱ्यांनी विमान सुरक्षित करून प्रवाशांना बाहेर काढले. सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. ही घटना मोहम्मदाबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. प्राथमिक तपासानुसार तांत्रिक बिघाड किंवा पायलट नियंत्रणात अडचण यांपैकी कोणते कारण असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

हेही वाचा - मोठी कारवाई ; लहानग्यांचा जीव घेणाऱ्या Coldrif कफ सिरप औषध कंपनीच्या मालकाला अटक

दरम्यान, अपघातानंतर सुदैवाने विमानाला कोणत्याही प्रकारची आग लागली नाही किंवा मोठे नुकसान झाले नाही. प्रशासनाने घटनास्थळी सुरक्षा वाढवून विमानतळ परिसर सील केला आहे. या अपघातामुळे स्थानिक प्रशासनाने सर्व लहान विमानांच्या उड्डाण प्रक्रियेचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत.


सम्बन्धित सामग्री