मुंबई : एकाच रेल्वे ट्रॅकवर समोरासमोर आल्याने दोन ट्रेनची धडक झाली आहे. रेल्वे अपघाताच्या घटना काही कमी होण्याचं नाव घेत नाहीत. या अपघातात इंजिन रेल्वे रुळावरुन खाली जाऊन सखल भागात तिरके होऊन पडल्याचे दिसत आहे. सुदैवानं या अपघातामध्ये अद्याप कोणाचा मृत्यू झालेला नाही. मात्र, दोन्ही ट्रेनचे लोको पायलट अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती नाजूक आहे. तसंच, रेल्वे मालमत्तेचं नुकसान झालं आहे. रेल्वे अपघाताच्या घटना कमी होण्याचं नाव घेत नसल्याने सोशल मीडियावर आता संताप व्यक्त केला जात आहे.
दोन रेल्वेगाड्या एकाच ट्रॅकवर येऊन हा अपघात घडला. या अपघाताचा भीषण व्हिडीओ समोर आला आहे. अपघाताची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचं कारण समजू शकलं नाही. दोन्ही ट्रेन समोरासमोर एकाच ट्रॅकवर कशा आल्याची याची चौकशी सुरू आहे. या दोन्ही मालगाड्या होत्या. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली, मात्र अशा त्रुटींमुळे पॅसेंजर ट्रेनसोबत असा अपघात झाला असता तर ओडिशाची पुनरावृत्ती झाली असती, अशी भीती सोशल मीडियावरुन व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - कशी नशिबानं थट्टा आज मांडली! शिकार आणि शिकारी एकाच विहीरीत; रानडुकराचा काळ आला होता, पण..
ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील फतेहपूर इथे घडल्याची माहिती मिळाली आहे. एकाच ट्रॅकवर या दोन मालवाहतूक ट्रेन आल्याने हा अपघात झाला. यामुळे ट्रेनच्या वेळापत्रकांवर मोठा परिणाम झाला आहे. दोन्ही ट्रेनचे लोको पायलट अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती अत्यावस्थ असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - Cheapest cashew in India: देशातील असे ठिकाण जिथे 100-200 रुपयांना मिळू शकतात पिशवी भरून काजू
हा भीषण अपघात नेमका कसा घडला? लोको पायलटची चूक होती का? सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रेल्वेचे अपघात रोखण्यासाठी सुरक्षा कवच लावण्यात येणार होतं, ते अद्याप लावलं का नाही असेही प्रश्न उपस्थित होत आहे.